Vidarbha Farmers Saam TV
महाराष्ट्र

Vidarbha Farmers: पश्चिम विदर्भ पुन्हा हादरला; शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी आली समोर

नुकतीच पश्चिम विदर्भातील गेल्या पाच महिन्यांची शेतकऱ्यांच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

Farmers News: पावसामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीला आला आहे. राज्यात सातत्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. शेतकरी हतबल होऊन थेट मृत्यूला मिठी मारत आहेत. पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. नुकतीच पश्चिम विदर्भातील गेल्या पाच महिन्यांची शेतकऱ्यांच्या आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. (Latest Marathi News)

पश्चिम विदर्भ पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्याने हादरला आहे. पाच महिन्यांत तब्बल ४२४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. तर शेतकरी आत्महत्या होऊच नयेत यासाठी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात गावपातळीवर सर्व्हे करण्यात येणार आहे. याद्वारे क्लस्टर शोधून तेथे फोकस करण्यात येऊन शासन योजनांच्या अंमलबजावणीसह अन्य उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती अमरावती विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी दिली.

पश्चिम विदर्भात पाच महिन्यात ४२४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्याचे प्रमाण वाढतच आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक यांच्याद्वारे ही माहिती गोळा करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यात आता आत्महत्या रोखण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे शेतकरी आत्महत्या थांबणार का हे येणाराच काळच सांगू शकेल.

खरीप हंगामाची लगबग...

शेतकऱ्यांची (Farmers) खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. बीडच्या माजलगावच्या मोंढा मार्केटमध्ये कपाशीच्या बियाणांची खरेदी करण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. कापूस बियाणांची बॅग यावर्षी शंभर रुपयांनी महागली आहे. मागच्या वर्षी ७५० रुपयाला मिळणारी बॅग यावर्षी ८५० रुपयांना खरेदी करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढणार असून घरात ठेवलेल्या कापसाची मात्र दरवाढ होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वरळीत ठाकरेसेना–भाजपमध्ये जोरदार राडा; शिवसैनिकांकडून फलकाची तोडफोड|VIDEO

Maharashtra Live News Update: वरळीत राडा करणाऱ्यांवर कारवाई होणार - देवेंद्र फडणवीस

Shocking: हृदयद्रावक! केळी खाताना घशात अडकली, ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; आईच्या कुशीत सोडले प्राण

Woolen Cloth : हिवाळ्यात सतत लोकरीचे कपडे घालून मळले? स्वेटर धुवताना फॉलो करा 'ही' खास ट्रिक

दारूसाठी पैसे देण्यास नकार; तरुणाची सटकली, आईला जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT