Abdul Sattar, CM Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

शिंदेंनी ५० थरांची राजकीय दहीहंडी फोडली त्याचा परिणाम..., अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या टोलेबाजीनंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.

साम टिव्ही ब्युरो

वर्धा : गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात, मात्र आम्ही देखील ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नाव न घेता लगावला. शिंदे यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली यावेळी त्यांनी हा टोला हाणला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या टोलेबाजीनंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांनी जी दहीहंडी फोडली त्याचा परिणाम ते मुख्यमंत्री झाले असं सत्तार म्हणाले. (Abdul Sattar News Today)

अब्दुल सत्तार कृषीमंत्री झाल्यानंतर प्रथमच वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सत्तार म्हणाले की, तो प्रयोग महाराष्ट्रात आणि देशात आगळावेगळा झाला. गुवाहाटीपासून तर गोव्यापर्यंत सर्व आपण बघितलं आहे. ज्यावेळेस लोकशाहीत असे प्रयोग होतात, त्यावेळी पक्ष आणि पक्षाचे नेते निर्णय घेतात. एकनाथ शिंदेजी हे आमचे नेते आहेत. त्यांनी जी दहीहंडी फोडली त्याचा परिणाम ते मुख्यमंत्रीही झाले. असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले की, 'एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री झाल्यावर आपण पाहतो आहे की, जी दहीहंडी मुंबईममध्ये झाली, त्यांच्यासाठी दहा लाखांचा संरक्षण कवच दिला.दहीहंडीत जे जखमी होतील त्यांना आर्थिक मदत दिली जाईल. विशेषतः यात सहभागी होणाऱ्यांना खेळाडूंना न्याय दिला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे'. (Abdul Sattar News)

'दोन वर्षात कोरोना संकटात धार्मिक, सामाजिक कार्यक्रम झाले नव्हते. यावेळेस एकनाथ शिंदे सरकारने खुल्या मनाने, खुल्या दिलाने लोकांना मदतीची घोषणा केली. त्यांच्या कार्यक्रमाची घोषणा केली आणी विशेषतः दहीहंडीचा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा व्हावा भविष्यामध्ये राज्यभरात हा सण उत्साहात साजरा होईल'. असा विश्वासही अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. गोविंदा थर लावून दहीहंडी फोडतात, मात्र आम्ही देखील ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असून हे थर यापुढे असेच वाढत जातील असा विश्वास देखील अब्दुल सत्तार व्यक्त केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

OBC Reservation: ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं?

SCROLL FOR NEXT