Abdul Sattar Kisan Helpline Numbar Saam TV
महाराष्ट्र

Kisan Helpline : शेतकऱ्यांनो...! नुकसानीची माहिती मोबाईल क्रमांकावर पाठवा; कृषिमंत्र्यांकडून नंबर जारी

Maharashtra Rain News : अवकाळीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. गारपिटीनं झालेल्या नुकसानीनं बळीराज्याला अश्रू अनावर झाले.

Satish Daud

Maharashtra Rain News : अवकाळीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. गारपिटीनं झालेल्या नुकसानीनं बळीराज्याला अश्रू अनावर झाले. दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवा असं आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.  (Latest Marathi News)

यासाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल क्रमांकही जाहीर केलेत. बंगला आणि कार्यालयातील मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आलेत. अवकाळी, गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती आणि फोटो पाठवण्यात सांगितलं आहे.

यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडून 9922204367 आणि 02222876342 हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना तुमचं नुकसान झालं असेल तर कृषिमंत्र्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन माहिती द्या असं यावेळी आवाहन करण्यात आलं आहे.

पुढील ३ दिवस अवकाळी पावसाचा अंदाज

राज्यात सलग पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागाला अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसला आहे.

अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शेतकरी (Farmer) अडचणीत सापडला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीस आलेली असताना, अवकाळीचा फटका बसल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झालेत. अशातच पुढील तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिली, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

SCROLL FOR NEXT