राज्यातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं रेट कार्ड उघड झालंय. यात कृषी खात्यातल्या बदल्यांचा रेटच सुरेश धसांनी जाहीर केलाय. यात मंत्री धनंजय मुंडेंचा किती वाट असतो हेदेखील त्यांनी सांगितलं. काय आहे बदल्यांचं रेट कार्ड..त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.
राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंवर कृषी विभागातील घोटाळ्यांचे गंभीर आरोप करत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धसांनी केलायं.. कृषी खात्यांतर्गत विविध साहित्य, खते आणि उपकरणांच्या खरेदींमध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचं आमदार धसांनी म्हटलंय. यासह, कृषी विभागातील कृषी सहायक ते उपसंचालक पदापर्यंतच्या बदल्यांसाठी तब्बल 100 कोटी रुपयांची व्यवहार झाल्याचा दाव आमदार धसांनी केलाय.
आमदार धसांनी या बदल्यासाठीचे रेटकार्डच जाहीर केलं. कृषी विभागात धनंजय मुंडेंच्या कालावधीत बदल्या आणि पदोन्नत्यांचे दर किती होते याचा पाढाच धसांनी वाचून दाखवलाय.
तंत्र अधिकारी (खते) - 1 कोटी
कृषी अधिकारी (खते) - 60 लाख
तंत्र अधिकारी बियाणे - 25 लाख
कृषी अधिकारी बियाणे - 15 लाख
कृषी उपसंचालक बियाणे - 80 लाख
तंत्र अधिकारी कीटकनाशके - 50 लाख
कृषी अधिकारी कीटकनाशके - 30 लाख
कृषी उपसंचालक - 5 लाख
उपविभागीय कृषी अधिकारी - 7 लाख
तालुका कृषी अधिकारी - 5 लाख
आजारी असल्याने मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या आमदार सुरेश धसांनी भर पत्रकार परिषदेत वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत या बदल्यांमधून मुंडेंना किती पैसे मिळायचे याचाही तपशील सादर केलाय.
कृषी सहाय्यक 60 हजार
मुंडेंचा वाटा - 20 हजार
कृषी पर्यवेक्षक 1 लाख 50 हजार
मुंडेंचा वाटा - 40 हजार
कृषी अधिकारी - 3 लाख
मुंडेंचा वाटा - पूर्ण 3 लाख
कार्यालयीन कृषी अधिकारी - 2 लाख
मुंडेंचा वाटा - पूर्ण 2 लाख
तालुका कृषी अधिकारी - 5 लाख
मुंडेंचा वाटा - पूर्ण 5 लाख
कार्यालयीन तंत्र अधिकारी - 4 लाख
मुंडेंचा वाटा - पूर्ण 4 लाख
उपविभागीय कृषी अधिकारी - 7 लाख
मुंडेंचा वाटा - पूर्ण 7 लाख
कृषी उपसंचालक - 5 लाख
मुंडेंचा वाटा - पूर्ण 5 लाख
बीड सरपंच हत्येप्रकरणी आरोपांचं रान पेटवणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धसांनी सनसनाटी आरोप करत मुंडेंना अडचणीत आणलंय..यासाठी मुंडेंच्या काळातील भ्रष्टाचाराची SIT स्थापन करून चौकशी करा, अशी मागणीही आमदार सुरेश धसांनी केलीये..त्यामुळे मुंडेंवरील आरोपांची आतातरी चौकशी होणार का की याही आरोपांचं वादळ धुळीस मिळणार आणि धनंजय मुंडे मंत्रीपदावर कायम राहणार हेच पाहायंच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.