Maharashtra APMC Election Saam TV
महाराष्ट्र

APMC Election: बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठा गोंधळ; शिंदे गटाकडून बोगस मतदान? अपक्ष उमेदवाराचा गंभीर आरोप

Market Committee Election: जळगावमध्ये बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने मतदान थांबवावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

Maharashtra Market Committee Election: राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून ठिकठिकाणी मतदानाला सुरूवात झाली असून मतदान केंद्राबाहेर पोलिसांना चोख बंदोबस्त आहे. अशातच पुणे आणि जळगावमध्ये बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तातडीने मतदान थांबवावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेत आज मतदान पार पडत आहे. शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटाकडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप करत एका अपक्ष उमेदवाराने थेट मतदान केंद्राबाहेर गोंधळ घातला. (Breaking Marathi News)

बोगस मतदान होत असल्याचं सांगून सुद्धा अधिकारी आमचं ऐकत नाही, अधिकारी सरकारच्या दबावाखाली आहे, असा आरोप अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आला. दरम्यान, यावेळी त्यांची सरकारी अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं, पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. (Maharashtra Political News)

पुण्यात बाजार समितीच्या निवडणुकीत गोंधळ

दरम्यान, जळगाव पाठोपाठ पुण्यातही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election) निवडणुकीत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाजी मराठा मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याचा दावा करत मतदारांनी गोंधळ घातला. दरम्यान, मतदान केंद्राबाहेर बऱ्याच मतदारांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत राडा करणाऱ्या मतदारांना मतदान बाहेर काढलं.

बोगस मतदान करायचं असेल, तर मतदान बंद करा असं म्हणत, मतदारांनी चांगलाच संताप व्यक्त केला. खोटे आधार कार्ड छापून मतदान केलं जात असल्याचा आरोपही मतदारांनी केला. हा प्रकार बंद झाला नाही तर आम्ही मतदानावर बहिस्कार टाकू, असं देखील मतदारांनी सांगितलं आहे. दरम्यान, हा वाद पोलिसांनी वेळेवर मिटवला असून सध्या पुण्यात शांततेत मतदान सुरू आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT