Kirit Somaiya Big Claim About Uddhav Thackeray Family: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक मोठा दावा केला आहे. रायगडच्या कोर्लई गावातील १९ बंगल्यांच्या घोटाळ्या प्रकरणाची फाईल मिळाली आहे. त्यामुळे लवकरच आपण याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांच्या दाव्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या अडचणी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)
रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाने १९ बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण, आरोप करण्यात आल्यानंतर हे १९ बंगले जमीनदोस्त आले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी केला आहे. (Breaking Marathi News)
किरीट सोमय्या यांनी याबाबत तक्रार सुद्धा दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती.
१९ बंगल्याच्या फसवणुकी प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली होती. या प्रकरणी सोमय्यांच्या तक्रारीनंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली. या प्रकरणी आता ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण सोमय्यांनी या प्रकरणाची हरवलेली फाईल आपल्याला साडल्याचा दावा केला आहे. (Maharashtra Political News)
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अधिकृतपणे आपला एक व्हिडीओ जारी करत आपली भूमिका मांडली आहे. “ठाकरे परिवाराची १९ बंगल्यांची गायब झालेली फाईल आता मला सापडली आहे. ८० पानांच्या या गायब फाईलीची गोष्ट मी उद्या सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत सांगणार”, असं किरीट सोमय्या यांनी व्हिडीओत सांगितलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आता काय आरोप करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.