सांगलीत पुरग्रस्तांचा चक्काजाम; तातडीने मदतीची मागणी... विजय पाटील
महाराष्ट्र

सांगलीत पुरग्रस्तांचा चक्काजाम; तातडीने मदतीची मागणी...

या चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारत आपल्या मागण्या प्रशासनाला सांगितल्या.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: सांगलीत मदतीच्या मागणीसाठी पुरग्रस्तांनी चक्काजाम आंदोलन केले. सांगलीच्या पुरबधितांना अद्यापही मदत न मिळाल्याने तसेच अनेकांना तुटपुंजी मदत मिळाल्याने पुरग्रस्तांनी हे चक्काजाम आंदोलन केले. (agitation of flood victims in Sangli; demanded Urgent help)

हे देखील पहा -

पुरामध्ये झालेल्या नुकसाणीबाबत मदतीसाठी भाजपाच्या नेतृत्वाखाली पुरग्रस्तांनी राज्य मार्ग रोखून धरला. सांगली-कोल्हापूर मार्गावर हा चक्काजाम करण्यात आला. यावेळी पूरग्रस्तांना तातडीने मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, भाजपा नेते शेखर इनामदार, पै. पृथ्वीराज पवार, धीरज सुर्यवंशी यांनी या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व केले. या चक्काजाम आंदोलनामुळे काही काळ सांगली-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारत आपल्या मागण्या प्रशासनाला सांगितल्या.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT