कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीवरून मनपाच्या आमसभेत गोंधळ; सभागृहात दिला ठिय्या अरुण जोशी
महाराष्ट्र

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीवरून मनपाच्या आमसभेत गोंधळ; सभागृहात दिला ठिय्या

युवा स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी मनपाच्या आमसभेत गोंधळ घातला. आमसभा सुरु असताना झालेल्या या प्रचंड घोषणाबाजीमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अरुण जोशी

अमरावती : अमरावती महानगरपालिकेतर्फे कुशल आणि अकुशल रिक्तपदांसाठी भरती करण्यात येत आहे. कंत्राटी पद्धतीने करण्यात येत असलेल्या या नोकर भरतीचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आले आहे, त्या कंपनीकडून उमेदवारांना पैसे मागितले जात असल्याची तक्रार आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर आज युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चक्क मनपाच्या आमसभेत गोंधळ घातला. आमसभा सुरु असताना झालेल्या या प्रचंड घोषणाबाजीमुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (agitation in the general meeting of the corporation over the recruitment of contract employees)

हे देखील पहा -

अमरावती महानगरपालिकेने कंत्राटीपध्दतीने जागा भरण्यासाठी इटकॉन नामक खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीच्या माध्यमातून मनपाच्या विविध विभागांमध्ये नोकरभरती करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच सदर कंपनीकडून उमेदवारांना २५ हजार रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी महानगरपालिकेच्या आमसभेत धिंगाणा घातला. आमसभा सुरु असताना या कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. भर सभेत अशाप्रकारे कार्यकर्ते गोंधळ घालत असल्याने सभागृहातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.

मनपातील सर्वपक्षीय सदस्यांनी या आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलक ऐकायला तयार नसल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे महानगरपालिका सभागृह आणि अमरावतीच्या जनतेचा अपमान झाला असल्याची प्रतिक्रिया महापौर चेतन गावंडे यांनी दिली. तसेच युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्या विरोध कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मनपा सभागृहात झालेल्या या अभूतपूर्व गोंधळामुळे अमरावतीकर जनतेचा अपमान झाला असून सभागृहाचा सन्मान धुळीस मिळाला असल्याचं यावेळी सभागृह नेते तुषार भारतीय यांनी सांगितले. आजपर्यंत या सभागृहात बाहेरील संघटनांनी येऊन अशा प्रकारे गोंधळ घातल्याचं कधीच घडलं नाही. त्यामुळे युवा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा भारतीय यांनी दिला. या संपूर्ण प्रकारची तक्रार महापौर चेतन गावंडे यांच्यासह सर्व पक्षीय सदस्यांतर्फे अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या कडे करण्यात आली असून आंदोलनकर्त्यांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT