दिवाळीत बनवलेली शेव उरले असून मऊ झालेत? पाहा ते पुन्हा कुरकुरीत कशी बनवावे?

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळीतील शेव

दिवाळीत जवळपास सर्वांकडे फराळ बनतो. तो फराळ खाऊन कंटाळा आल्यानंतर अजूनही काहींच्या घरी फराळ उरला असेल. यामध्ये शेवही उरले असतील आणि ते मऊ पडले असतील तर ते पुन्हा कुरकुरीत करण्याच्या सोप्या टीप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत.

ओव्हनमध्ये हलके गरम करा

शेव एका ट्रेमध्ये पसरवा आणि ओव्हनमध्ये ३-५ मिनिटं गरम करा. यामुळे शेवमधील अतिरिक्त ओलावा निघून जातो. गरम झालं की लगेच थंड होऊ द्या, तेव्हा कुरकुरीतपणा परत येतो.

कढईत मंद आचेवर ड्राय-रोस्ट करा

कढईला तेल न घालता शेव हलके हलके परता. फक्त २-३ मिनिटं परता, जास्त वेळ केलं तर रंग बदलू शकतो. थंड झाल्यावर शेव पुन्हा ताजे आणि कुरकुरीत होतात.

मायक्रोवेव्हचा वापर करा

शेव मायक्रोवेव्ह प्लेटवर पसरवून 30-40 सेकंद गरम करा. मायक्रोवेव्ह ओलावा पटकन काढतो. नंतर प्लेट बाहेर काढून शेव पूर्ण थंड होऊ द्या.

कागदी पेपरवर पसरवून उन्हात ठेवा

शेव कागदावर पातळ थरात पसरवा. हलके सकाळचे कोवळे ऊन मिळाले तरी चालेल. ओलावा बाहेर गेल्याने शेव पुन्हा कुरकुरीत होतात.

एअरफ्रायर वापरू शकता

शेव एअरफ्रायरमध्ये 150°C वर 2-3 मिनिटं ठेवा. मध्ये एकदा हलके शेकून घ्या. यामुळे कुरकुरीतपणा नैसर्गिकरीत्या परत मिळतो.

गरम शेव लगेच डब्यात भरू नका

तळल्यानंतर शेव पूर्ण थंड होऊ द्या. गरम शेव डब्यात भरली तर वाफेमुळे ते मऊ पडतात.

साठवण्यासाठी स्टील किंवा काच डबा वापरा

प्लास्टिकच्या डब्यात ओलावा जास्त टिकतो. काच किंवा स्टीलच्या हवाबंद डब्यात शेव जास्त वेळ ताजे राहतात. आत हवा न शिरल्यामुळे कुरकुरीतपणा कायम राहतो.

Sindhudurg Tourism: सिंधुदूर्गात लपलेला शिवकाळातील दुर्मिळ किल्ला! महाराजांच्या साम्राज्यातील गुप्त रणनीतीस्थळ

येथे क्लिक करा