पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गाढव आंदोलन!
पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गाढव आंदोलन! अरुण जोशी
महाराष्ट्र

पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे गाढव आंदोलन!

अरुण जोशी

अमरावती : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम देतांना जी 'मस्टर' ची अट लावली त्यामुळे लाभार्थ्यांना घर उभं करत असताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोबतच बऱ्याच लाभार्थ्यांना धनादेशाचा दुसरा टप्प्पा सुद्धा अजून पर्यंत मिळालेला नाही. यातील बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असल्याचे निदर्शनास आले आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

हे देखील पहा :

अशातच या घरकुल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी ह्या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे व शहर जिल्हा अध्यक्ष निलेश शर्मा यांच्या नेतृत्वात आज गाढव आंदोलन करण्यात आले. या वेळी जवादे मंगल कार्यालय बस स्टैंड अमरावती येथून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मालटेकडी कार्यालय येथे गाढव घेऊन कार्यकर्ते पोहचले.

तेथे प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांच्या समस्या मांडल्या. या वेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी हि करण्यात आली या आंदोलनात साहिल सोलीव, अनिरुद्ध होले, कृणाल विधले ,प्रफुल संप, शैलेश राऊत, प्रतीक भोकरे, हेमंत बोबडे, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai University Exams: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवीन वेळापत्रक

Shirur Loksabha: अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात! शिरुर मतदार संघात घेणार ५ सभा

Today's Marathi News Live: पंतप्रधान मोदी १० मेला नाशिक दौऱ्यावर येणार, पिंपळगामध्ये जाहीर सभा घेणार

Buldhana Breaking: किरकोळ कारणावरून २ गटांत तुंबळ हाणामारी; गावात तणाव, १८ आरोपी अटकेत

Prices Of Pulses: डाळींच्या किंमती कडाडल्या!जाणून घ्या,आजचा प्रतिकिलोचा दर किती?

SCROLL FOR NEXT