इंधन दरवाढीचा निषेध; राष्ट्रवादी महिला आघाडीने पंतप्रधानांना पाठवल्या गोवऱ्या जयेश गावंडे
महाराष्ट्र

इंधन दरवाढीचा निषेध; राष्ट्रवादी महिला आघाडीने पंतप्रधानांना पाठवल्या गोवऱ्या

वाढती महागाई, इंधनाचे गगणाला भिडलेले दर आणि गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पोस्टाने पाठवून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

जयेश गावंडे

अकोला : वाढती महागाई, इंधनाचे गगणाला भिडलेले दर आणि गॅस दरवाढीचा निषेध नोंदवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या पोस्टाने पाठवून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे.

हे देखील पहा -

वाढत्या गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाईला सामान्य जनता त्रस्त झाली असून सर्वत्र याचा निषेध नोंदवण्यात येत आहे. अकोल्यातील मोठ्या पोस्ट ऑफिस समोर राष्ट्रवादीने आंदोलन करत निषेध नोंदवला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला महानगर अध्यक्षा रिज़वाना शेख अजी़ज़ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन

करण्यात आले. आंदोलनात भाजप आणि मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.तसेच गॅस दरवाढीचा निषेध दर्शविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टद्वारे शेणाच्या गोवऱ्या देण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्षा मंदा देशमुख, अध्यक्षा अख़्तर बेगम,अध्यक्षा मेघा पाचपोर,सरलाताई वरगट, अध्यक्षा असंघटित कामगार अनिताताई, वीजेएनटी अध्यक्ष माधुरीताई गिरी, शलीनी योतकार आदी कार्यकर्त्या उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinod Tawde Bihar Role: बिहारच्या विजयामागे मराठी चेहरा, एनडीएच्या विजयाचे शिल्पकार तावडे?

बिहारमध्येही लाडकीचा डंका, बिहारची लाडकी गेमचेंजर?

Maharashtra Live News Update: नितीन शंकर गिलबिले गोळीबार प्रकरण, दोन्ही फरार आरोपींना अटक

Saturday Horoscope : पैशांची भरभराट होईल, शेतीमधूनही होणार फायदा; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या गोष्टी घडतील

आबा, तात्या! आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच 'हे' काम करा, नाहीतर ५ लाखांचा होईल तोटा

SCROLL FOR NEXT