Shocking visuals reveal evidence of Aghori rituals and wildlife trafficking uncovered from accused mobiles in Chandrapur. saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्रात 'अघोरी' नंगानाच, मोबाईलमुळे भोंदूच्या रॅकेटचा पर्दाफाश

Aghori Baba Racket Busted Chandrapur Wildlife Trafficking: महाराष्ट्रात अघोरी बाबांचा नंगानाच काही थांबण्याचं नाव नाही... अशातच चंद्रपुरात प्राण्यांची तस्करी करणाऱ्या अघोरी बाबांचा कसा पर्दाफाश झालाय... आणि महाराष्ट्रात भोंदूबाबांनी जनतेला कसं वेठीस धरलयं...

Snehil Shivaji

पुरोगामी महाराष्ट्राला आता भोंदू बुवा बाबांचा विळखा पडलाय...होय महाराष्ट्र अघोरी होत चाललाय की काय अशी बुवाबाबांची काळीकृत्य उघडी पडतायेत. चंद्रपुरात वनविभागानं केलेल्या कारवाईत एक मोठ्या रॅकेटचा आणि त्यांच्या किळसवाण्या कारनाम्याचा पर्दाफाश झालाय. कासवांची तस्करी करणाऱ्या सहा जणांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांच्या मोबाईल मधूनच या अघोरी टोळीचं बिंग फुटलंय. त्यांच्या मोबाईलमध्ये जे सापडलं त्यानं पोलिसही चक्रावून गेले..

या आरोपींच्या मोबाईलमध्ये वन्यजीव तस्करीसोबतच अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग आढळले. स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ चित्रीकरण, घुबड आणि कासवांचे फोटो, तसेच अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांचे फोटो, त्यांच्या जन्मकुंडल्या आणि इतकेच नव्हे तर त्यांच्या खासगी अवयवांचे फोटोही हाती लागले आहेत. काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही आरोपींनी ठेवली होती.

पोलिसांनी गंगाधर बुरांडे, मोरेश्वर देवतळे, ओम शिंदे, हेमचंद शेंडे, धवल वेलादी आणि राजेंद्र दिवसे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलीये. परंतू या टोळीचे रॅकेट हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील ग्रामीण भागात सुरू असून अनेकांना गंडवल्याचं पुढं आलंय. या वर्तुळात मांत्रिकाला टेस्टर म्हटलं जातं. एखादी महिला किंवा प्राणी अघोरी पूजेसाठी योग्य आहे की नाही, हे हा टेस्टर ठरवत होता. त्यानंतर निर्जन स्थळी किंवा स्मशानभूमीत त्यांच्यावर अघोरी विधी व्हायचे यावेळी त्यांच्या लैंगिक शोषणाचाही संशय आहे. सोन्याची बिस्किटं गुप्तधनात मिळवल्याचा हे लोक दावा करायचे परंतू वनविभागाच्या छाप्यात हे बिस्किटं नकली असल्याचं उघड झालंय.

महाराष्ट्रात सध्या सगळीकडेच अघोरी प्रकार सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरच्या स्मशानातल्या चुटकीवाल्या बाबानं उच्छाद मांडला होता. तर नाशिकमधला खरात, मलाडमधला रिदम पांचाळसारखा ढोगींबाबा..खेड आणि संगमनेरमधल्या बुवाबाबांनी महाराष्ट्राला पार अघोरी करून सोडलाय. मात्र याला केवळ हे भोंदू आणि अघोरी बाबच जबाबदार नाहीत तर त्यांना बळी पडणारी जनताही तेवढीच गुन्हेगार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT