तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमिवर नागपूरची चिंता वाढली; ३० टक्के नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित Saam Tv
महाराष्ट्र

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमिवर नागपूरची चिंता वाढली; ३० टक्के नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित

१०० टक्के लसीकरणासाठी नागपूर मनपाचे प्रयत्न

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर: नागपूरमध्ये ३० टक्के पात्र नागरिकांनी कोरोना (Corona) लसीचा दुसरा डोज न घेतल्यामुळे इतरांचे टेन्शन वाढल आहे. नागपूरात (Nagpur) कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यामध्ये (district) ४४१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोरोना (Corona) लस हे महत्त्वाचे हत्यार आहे. मात्र, नागपूरात आतापर्यंत पात्र नागरिकांपैकी ३० टक्के जणांनी लसीचा (vaccine) दुसरा डोज घेतला नाही. त्यामुळे नागपूरकरांची चिंता आणखीच वाढली आहे.

हे देखील पहा-

नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या दीड हजारावर गेली आहे. आतापर्यंत ३० जणांना ओमिक्रॅानची (Omicron) लागण झाली. कोरोना वेगाने वाढत असताना, लसीचा दुसरा डोज न घेतलेल्या ३० टक्के लोकांनी आणखी टेंन्शन वाढले आहे. या नागरिकांना शोधून त्यांचे लसीकरण (Vaccination) पूर्ण करण्याचा प्रयत्न नागपूर महापालिका (Municipal Corporation) प्रशासन युद्ध पातळीवर करत आहेत.

शहरात १५० वर लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. १८ वर्षावरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. नागपुरात लसीकरणासाठी १९.७३ लाख पात्र नागरिक आहेत. यामधून १९ लाखाहून अधिक पहिला आणि ११ लाखांच्यावर दुसरा डोज देण्यात आला आहे. शहरात पहिला आणि दुसरा डोज मिळून ३०.६० लाख डोस पूर्ण झाले आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT