Solapur Saam
महाराष्ट्र

डॉ. वळसंगकरांनंतर आणखी एका डॉक्टरने आयुष्य संपवलं, भाड्याच्या घरात गळा चिरून आत्महत्या | Solapur

Doctor ends his life in rented house: सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य नमबियार या नुकत्याच एम.बी.बी.एस. पूर्ण केलेल्या तरुण डॉक्टरने स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली आहे.

Bhagyashree Kamble

सोलापूर शहरातील न्यूरोलॉजिस्ट शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण ताजे असतानाच आणखी एका शिकाऊ डॉक्टरने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य नमबियार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे. आदित्य भाड्याच्या रूममध्ये राहत होता आणि तिथेच त्याने आयुष्य संपवलं. आदित्यने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

डॉ. आदित्य नमबियारने नुकतंच आपलं एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केलं होतं. तो शिकाऊ डॉक्टर असून, आदित्य सोलापुरातील एका भाड्याच्या रूममध्ये राहत होता. रूमच्या बाथरूममध्ये त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. त्याच्या मृतदेहाच्या शेजारी एक चाकू आणि कात्री दिसून येत आहे. तसेच त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेच्या तपासाला सुरूवात केली असून, आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलीस पुढील तपास करीत आहेत. ही घटना समोर आल्यानंतर ही आत्महत्या आहे की हत्या, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली होती. मात्र, हे प्रकरण ताजे असतानाच डॉ. आदित्य नमबियार या तरूणाने देखील टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण काय होते, त्याने हे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Woman Dragged and Assaulted: हिंगोली हादरलं! ७५ वर्षीय वृद्धेवर नराधमाकडून अत्याचार|VIDEO

Maharashtra Live News Update: भरदिवसा युवकाची हत्या, शेगाव हादरले

Malaika Arora: फिटनेस क्विन मलाइका अरोराचं वय नक्की किती?

Puran Poli Ice Cream Recipe : सणासुदीला आवर्जून घरी ट्राय करा पुरणपोळी आईस्क्रीम, फॉलो करा सिंपल रेसिपी

Health Tips: जमिनीवर बसून जेवल्याने काय होते? फायदे की तोटे

SCROLL FOR NEXT