पेट्रोल नंतर डिझेलची वाटचाल शंभरीकडे ? Saam Tv
महाराष्ट्र

पेट्रोल नंतर डिझेलची वाटचाल शंभरीकडे ?

राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने दरवाढ सुरूच आहे. सध्या यवतमाळ येथे पेट्रोलचा दर हा 104.88 रुपये आहे तर, डिझेलचा दर हा 95.48 रुपये इतका आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसाद नायगावकर

यवतमाळ  : राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने दरवाढ सुरूच आहे. सध्या यवतमाळ येथे पेट्रोलचा दर हा 104.88 रुपये आहे तर, डिझेलचा दर हा 95.48 रुपये इतका आहे .पेट्रोल दरवाढीसोबतच डिझेलमध्येही सातत्याने वाढ होत आहे. कुठेतरी पेट्रोल नंतर डिझेल देखील शंभरी गाठतंय का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. After petrol, diesel goes to hundreds ?

हे देखील पहा -

आज पेट्रोलचे आणि डिझेलचे दर हे 27 पैशांनी महागले आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरात रोज सकाळी 6 वाजता बदल होत असतो आणि सकाळी 6 वाजताच नवे दर लागू होत असतात. परकीय चलन दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किंमती काय आहेत. यानुसार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होतो.

रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे मात्र सर्वसामान्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. सध्या शेतीचे कामे चालू आहेत. मजुरी परवडणारी नसल्याने शेतकरी सर्व कामे यांत्रिकी पद्धतीने करतात. जेंव्हा वीज नसते तेंव्हा उन्हाळी पिकांना डिझेल पंपाच्या साहाय्याने पाणी उपसून शेतीस दिले जाते.

अशातच डिझेल आणि पेट्रोलचे भाव सातत्याने वाढत असल्याने सामान्य नागरिकांसह शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले आहेत. अशा स्थितीत केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेलची ज्या पद्धतीने दरवाढ केली आहे ही क्रूर थट्टाच म्हणावी लागेल.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT