Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Cyclone Alert : महाराष्ट्रावर नव्या वादळाचं संकट? १५ जिल्ह्यात धो धो पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने अंदमान-निकोबार बेटांसाठी ‘सायक्लोन अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

हवामान खात्याने अंदमान निकोबार बेटांसाठी ‘सायक्लोन अलर्ट’ जारी केला

बंगालच्या उपसागरावर तयार होत असलेली प्रणाली ४ नोव्हेंबरपासून चक्रीवादळात रूपांतरित होणार

महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता

राज्यात ढगाळ वातावरण आणि तापमानातील चढ-उतार कायम राहणार

समुद्रातील मोंथाचं संकट जरी दूर झालं असलं तरी हवामान खात्याने अंदमान आणि निकोबार बेटांसाठी 'सायक्लोन अलर्ट' जारी केला आहे. बंगालच्या उपसागरावर तयार होणारी ही नवीन प्रणाली ४ नोव्हेंबरपासून चक्रीवादळात रूपांतरित होणार असल्याचंही हवामान विभागाने म्हटलं आहे. या नव्या वादळामुळे विश्रांती घेतलेल्या पावसाची राज्यासह इतर ठिकाणी हजेरी लागणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.

राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काल म्हणजेच सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता.

आज मुंबई, ठाणे , पालघर, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात आजपासून म्हणजेच ४ नोव्हेंबरपासून चक्रीवादळ घोंगावणार आहे. या चक्रीवादळामुळे हवामान खात्याने अंदमान आणि निकोबार बेटांसाठी 'सायक्लोन अलर्ट' जारी केला आहे. याचा परिणाम पुन्हा एकदा राज्याच्या हवामानावर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानात होणार सततचा बदल पावसाला पोषक वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे पुढील काही तास राज्यासह इतर भागात महत्त्वाचे असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT