Devendra Fadnavis, ajit pawar and eknath shinde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: लोकसभेतल्या अपयशामुळे राज्यात महायुतीत फूट? विधानसभेसाठी भाजपची एकला चलोची भूमिका?

BJP News: लोकसभेतल्या अपयशामुळे भाजप आता विधानसभा निवडणुका एकटा लढणार, अशी सूत्रांची माहिती आहे.

Satish Kengar

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. लोकसभेतल्या अपयशामुळे भाजप आता विधानसभा निवडणुका एकटा लढणार, अशी सूत्रांची माहिती आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढायची, याकडे भाजप नेतृत्वाचा कल राहू शकतो. अशीही माहिती सूत्रांनी दिलीय.

ज्या पक्षाच्या लोकांवर प्रचंड आरोप झाले, त्याच लोकांना सत्तेत सहभाग करण्याचा प्रयोग भाजपच्या मूळ मतदाराच्या पचनी पडला नाही, अशी भाजपअंतर्गत चर्चा आहे, अशीही माहिती मिळतेय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भजापनं एकला चलोची भूमिका घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

मंत्रिपद सोडण्याची फडणवीसांची तयारी

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजप आणि महायुतीला कमी जागा मिळाल्या. याची अनेक कारणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. मात्र या अपयशाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी खुल्या पत्रकार परिषदेत मोठा राजकीय बॉम्ब टाकला.

फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्रिपद सोडण्याचीच तयारी दाखवली. पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छ व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंगच त्यांनी यातून फुंकलंय.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षातील नेत्यांनी वरपासून ते खाली तळापर्यंत मेहनत घेतली. मात्र आम्हाला कमी मिळाल्या. जनतेने आम्हाला नाकारलं. राज्यात लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व आपण करत होतो, त्यामुळे राज्यात आलेल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत आहे. राज्यात कमी जागा मिळाल्यात त्यात मी कुठेतरी कमी पडलो असून, त्यामुळे मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT