Sharad Pawar on Mahayuti  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपला दे धक्का! हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी; आणखी धक्के बसणार, शरद पवारांचा महायुतीला इशारा

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला सुरुंग लावलाय. त्यातच हर्षवर्धन पाटलांना गळाला लावत पवारांनी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिलाय. अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील अस्वस्थ होते.

नेमकी हिच अस्वस्थता हेरून शरद पवारांनी डाव टाकला. तर शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर पाटील तुतारी फुंकणार हे स्पष्ट झालं होतं. त्याचीच घोषणा हर्षवर्धन पाटालंनी पत्रकार परिषदेत केलीय. मात्र हर्षवर्धन पाटलांनी भाजप का सोडली? याची करणे काय आहेत? हे जाणून घेऊ...

हर्षवर्धन पाटलांनी भाजप का सोडली?

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये दत्तात्रय भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांचा 3 हजार मतांनी पराभव केला. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्याने हर्षवर्धन पाटील अस्वस्थ झाले होते, असं सूत्रांनी म्हटलं होतं. विद्यमान आमदारालाच उमेदवारी हे महायुतीतील सूत्र असल्याने पाटलांची अडचण होऊ शकली असती. इंदापूरची जागा राष्ट्रवादीची असल्याने हर्षवर्धन पाटलांचा तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

2019 च्या पराभवानंतर भाजपने हर्षवर्धन पाटलांना साखर संघाचे अध्यक्षपद दिलं होतं. मात्र त्यानंतर भाजप सोडण्याचं आणखी एक कारण हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील यांनी सांगितलंय.

दरम्यान, आधी समरजित घाटगे, त्यांच्यानंतर पुण्यातील बापूसाहेब पठारे यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय. मात्र हर्षवर्धन पाटलांच्या रुपाने तीनच नाही तर विधानसभेपूर्वी महायुतीला अनेक धक्के देण्याचा इशाराच पवारांनी दिलाय. असे आणखी बरेच धक्के बसणार आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांना गळाला लावून भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोंडी केलीय. मात्र आणकी धक्के देणार असल्याचा इशारा पवारांनी दिल्यामुळे आणखी कोण कोण तुतारी फुंकणार याची उत्सुकता लागलीय. तर हर्षवर्धन पाटलांनी हाती घेतलेली तुतारी विधानसभेला वाजणार की घड्याळाची वेळ भरणेंना साथ देणार? याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

Healthy Relationship साठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो...

SCROLL FOR NEXT