Devendra Fadnavis and Chandrashekhar Bawankule Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: पराभवानंतर भाजपचा अॅक्शन प्लॅन, अडचणीतील 33 मतदारसंघांसाठी आखली नवीन रणनीती

Girish Nikam

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पिछेहाट झाल्यावर भाजप सतर्क झाला आहे. भाजपने 28 जागा लढवल्या होत्या. मात्र त्यातील 9 जागांवरच यश मिळालं. 2019 मध्ये 22 खासदारांची संख्या 2024 मध्ये थेट एका आकड्यावर आल्यानं भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीचा पराभव झालेल्या 33 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.

विशेष म्हणजे या 33 मतदारसंघांसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षक पराभवाची कारणे शोधून 22 जून पूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अहवाल सादर करणार आहेत.

निरीक्षक कोणत्या बाबी तपासणार?

  • महायुतीमध्ये समन्वय होता की नाही?

  • भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा कुठे-कुठे फटका बसला?

  • प्रचारात भाजपचे कोणते नेते सक्रिय होते ?

  • प्रचारापासून कोणते नेते दूर राहिले?

याचा आढावा निरीक्षक घेणार आहेत. दरम्यान फडणवीसांनी पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना निराशा झटकून कामाला लागा, अशी सुचना केलीये. आपण पुन्हा झेप घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

राज्यात मविआची सरशी झाल्यानं भाजपनं सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. महत्वाच्या कोणत्या मतदारसंघात कोण निरीक्षक आहे ते जाणून घेऊ...

  • उत्तर-मध्य मुंबई - हर्षवर्धन पाटील

  • बारामती - मंगलप्रभात लोढा, महिला बालकल्याणमंत्री

  • अहमदनगर - मेधा कुलकर्णी, खासदार

  • दिंडोरी - विजयाताई रहाटकर, नेत्या

  • बीड - संभाजी पाटील निलंगेकर, आमदार

  • नांदेड - राधाकृष्ण विखे-पाटील, महसूलमंत्री

  • जालना - चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

  • अमरावती - आशिष देशमुख, माजी आमदार

  • चंद्रपूर - श्रीकांत भारतीय, आमदार

  • माढा - अमित साटम, आमद्रार

पक्ष निरीक्षकांच्या अहवालाचा उपयोग विधानसभा निवडणुकीत भाजपला होणार आहे. संघाकडूनही आमदारांची कार्यशाळाही घेतली जाणार आहे. मात्र लोकसभेतील यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या मविआशी भाजप कसा सामना करणार हे पाहणं महत्वाचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT