बालाजी सुरवसे | धाराशिव
एकनाथ शिंदे यांनी उठाव करत शिवसेना आमदारांसह गुवाहाटी गाठली होती. त्यावेळी अवघ्या देशाचं लक्ष गुवाहाटीवर केंद्रीत झालं होतं. या बंडामागील अनेक गोष्टी काही काळानंतर बाहेर आल्या होत्या. तर काही गोष्टी अजूनही गुलदस्त्यात आहेत. याच काळात गुवाहाटीतील काही घटनांबाबत अॅड. असीम सरोदे यांनी खळबळजनक दावा आणि आरोप केले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे गेलेल्या दोन आमदारांना मारहाण करण्यात आली होती. तसेच गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये आमदारांनी एअर होस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप असीम सरोदे यांनी केला. धाराशिव येथील एका कार्यक्रमात सरोदे बोलत होते.(latest marathi news)
असीम सरोदे म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार बंड करून गुवाहाटी येथे गेले होते. तेथे सर्वजण हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. आमदार राहत असलेल्या या हॉटेलमध्ये कुणालाही एन्ट्री नव्हती. मात्र एका खासगी एअरलाइन्ससाठी या हॉटेलमधील काही खोल्या राखीव होत्या. त्यामुळे या एअरलाईन्सचे कर्मचारी येथे राहू शकत होते. दरम्यानच्या काळात तेथे एअर होस्टेस थांबल्या होत्या. या एअरहोस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. हे महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. आमदारांनी हे कृत्य केल्याचा गंभीर आरोपही सरोदे यांनी केला.
याशिवाय एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या दोन आमदारांना हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. गुवाहाटीच्या हॉटेलमधून एक आमदार ८ किलोमीटर पळून गेला होता. या आमदाराला पकडून आणण्यात आलं आणि त्यांना कुणी मारहाण केली हे शोधावं, असंही असीम सरोदे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.