Video: जनावरही खाणार नाही असा आहार महिला आणि बालकांना दिला जातोय  Saam TV
महाराष्ट्र

Video: जनावरही खाणार नाही असा आहार महिला आणि बालकांना दिला जातोय

आहाराच्या माध्यमातून ही बालकं आणि महिलांच्या जीवाशी खेळलं जातंय.

संजय डाफ

नागपूर: महिला व बाल कल्याण विभागामार्फत (Department of Women and Child Welfare) अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट आणि भेसळयुक्त (Adulterated diet) असल्याचा धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. सहा वर्षाखालील बालकं, गर्भवती महिला आणि स्तनदा महिलांना हा आहार दिला जातो. मात्र, जनावरही खाणार नाही असा आहार या महिला आणि बालकांना दिला जातोय. त्यामुळं या निकृष्ट आणि भेसळयुक्त आहाराच्या माध्यमातून या महिला आणि बालकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.

1 ते 7 सप्टेंबर हा पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. मात्र, या सप्ताहादरम्यान हा निकृष्ट आणि भेसळयुक्त आहाराचा प्रकार पुढं आलाय. लहान मुलांना शाळेची ओढ लागावी, त्यांना पोषण आहार मिळावा यासाठी अंगणवाड्या च्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. नागपूरात 981 अंगणवाड्या आहेत. गर्भवती महिला आणि स्तनदा महिलांनाही या अंगणवाड्या च्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. मात्र, या आहाराच्या माध्यमातून ही बालकं आणि महिलांच्या जीवाशी खेळलं जातंय.

भाजपनं या सर्व प्रकाराची चौकशीची मागणी केलीय. हा प्रकार म्हणजे लहान मुलं आणि महिलांच्या जीवाशी खेळण्याचा असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. गर्भवती महिला आणि बालकांना सकस आहार देण्याची गरज आहे, मात्र, भ्रष्टाचाराची कीड लागल्यानं निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातोय. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.

साम च्या बातमीची दखल महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा पोषण आहार हा खाण्यायोग्य नाही. गरीब असल्यामुळं आम्हाला जनावरंही खाणार नाही असा आहार दिला जातो. यात अधिकारी, कंत्राटदार आणि अधिकारी सहभागी असल्याचा आरोप या प्रकाराची तक्रारदारांनी केला आहे.

महाराष्ट्र स्टेट कंझुमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन मार्फत हा पोषण आहार दिला जातो. निकृष्ट आणि दर मात्र बाजारभावापेक्षा अधिक लावण्यात आले आहेत. त्यामुळं यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं दिसून येतंय. त्यामुळं या सर्व प्रकारची चौकशी दोषींवर कारवाई करावी आणि या महिला आणि बालकांच्या जीवाशी खेळ थांबवावा.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Decision: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Shrirampur Crime : हातात बंदुका घेऊन पाठलाग; श्रीरामपुरमध्ये टोळी युद्धाची भीती, घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video: आधी हात जोडून नमस्कार केला, मग एक मराठा, लाख मराठा घोषणा दिल्या; फॉरेनरने जिंकली सर्वांचीच मने

Allu Arjun Grandmother Death: अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचे निधन

Maharashtra Live News Update: मला जिल्हा परिषद अध्यक्ष करा - हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT