गायकवाड कुटुंबियांचा उपक्रम
गायकवाड कुटुंबियांचा उपक्रम 
महाराष्ट्र

लग्नातील अतिरिक्त खर्च टाळून गायकवाड कुटुंबियांचा कौतुकास्पद उपक्रम

Pralhad Kamble

नांदेड : विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून नांदेड येथिल गायकवाड कुटुंबियांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. नांदेडमधील बुद्धिस्ट असोशिएशनला गायकवाड कुटुंबियांकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत देण्यात आले आहेत.

सध्याच्या कठीण काळात प्रत्येकांनी एकमेकांची मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नुकतेच कोरोना आणि दान पारमिताला अनुसरुन सर्वांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मदत करण्याचे आवाहन केले होते. डॉ. कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड येथील पत्रकार जयपाल गायकवाड यांनी आपल्या विवाह सोहळ्यात कोरोना काळात उपयोगी येणारे दीड लाख किमतीचे दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नांदेड बुद्धिस्ट असोशिएशनला मोफत दिले.

हेही वाचा - मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात लहान तुळशी तलाव तुडुंब भरला

जयपाल गायकवाड यांचा रविवारी (ता. ११) संबोधी चिखलीकर यांच्याशी विवाह झाला. या सोहळ्यात आपण कोरोनाच्या काळात अनेकांना गमावले, ही एका व्यक्तीच्या कुटुंबाची हानी तर आहेच पण समाजाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय साधने व सुविधा उपलब्ध करुन देणे ही खूप आवश्यक बाब बनली आहे. कोरोना काळात सामूहिकपणे गरजूंना मदत केली पाहिजे या हेतूने डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकार जयपाल आणि संबोधी यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत म्हणून दिले. पत्रकार जयपाल आणि संबोधी यांनी संकटकाळात समाज उपयोगी दान पारमिता ही सर्वांसाठी आदर्श घेण्यासारखी असल्याची चर्चा सध्या होत आहे.

दरम्यान, डॉ. कांबळे यांनी कोरोना महामारीच्या काळात राज्यात २५ हजार गरजुंना अन्नधान्याचे किट्स वाटप केले. तसेच मूळ थायलंडच्या असणाऱ्या डॉ. कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्हॅनीच कांबळे यांच्याकडून भारताला २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आले. त्यासोबतच नुकत्याच ३१ ऍम्ब्युलन्सही भारताला मिळाल्या आहेत. इतके मोठे दान आपल्यापर्यंत पोहचवण्याचं काम डॉ. कांबळे यांच्या माध्यमातून होत असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही मदत केली असल्याचे जयपाल गायकवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर, कोरोनाकाळात इतरांपेक्षा ज्यांचे जीवनमान चांगल्या स्थितीत आहे अशांच्या आचरणामध्ये करुणेची, दान पारमितेची कमतरता दिसून आली होती. या गोष्टींचा विचार करुन डॉ. कांबळे यांनी समाजाला गरज असेल तेव्हा आपण पुढे यायला पाहिजे असे आवाहन केले होते. आपण त्याचेच आचरण करत असल्याचेही गायकवाड म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT