Raigad News राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

रायगडात शिवसेनेचे आज भगवे वादळ; आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

माणगावमध्ये मेळाव्याला उपस्थित राहणार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज रायगड (Raigad) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. माणगाव येथे पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या मतदारसंघातच शिवसेनेचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला आदित्य ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, उदय सामंत, अनिल परब मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेकडून मेळाव्याची जोरदार करण्यात आली असून माणगावमध्ये भगवे वादळ निर्माण झाले आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसैनिकांना काय बोध देणार याकडे आता लक्ष लागले आहे.

हे देखील पहा -

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे 28 ते 30 असा तीन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. आज 30 मार्च रोजी आदित्य ठाकरे हे रायगडात आहेत. आज दुपारी 3 वाजता लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृह कामाचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. साडेचार वाजता माणगाव येथे टिकमबाई मेहता कॉमर्स कॉलेज पटांगणावर शिवसेनेच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आदित्य ठाकरे मुंबईकडे रवाना होणार आहेत.

रायगडात अलिबाग, महाड, कर्जत या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच मेळावा होत आहे. मात्र या तीनही मतदार संघात मेळावा आयोजित न करता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात माणगाव येथे मेळावा होत आहे. श्रीवर्धन मतदार संघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अंतर्गत संघर्ष हा सुरूच आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना श्रीवर्धन मतदार संघात आपली ताकद वाढीसाठी प्रयत्न करीत आहे का असा अंदाज जाणकार लावत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत निलेश सांबरे हे विजयी

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

Bus Accident News : भीषण अपघात! मुंबईतून पर्यटनासाठी राजगडावर निघालेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळली; २ जणांचा मृत्यू

Shocking : खळबळजनक! प्रेमसंबंधात पतीचा अडथळा, बॉयफ्रेंडच्या मदतीने पत्नीने काढला काटा

SCROLL FOR NEXT