aditya thackeray  saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी जळगावात तणाव; धरणगावात बॅनर फाडले

जळगावात शिंदे गट व उद्धव ठाकरे समर्थक आमने-सामने

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

जळगाव - युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज जळगाव जिल्ह्याचे दौऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वीच जळगावात (Jalgaon) शिंदे गट व उद्धव ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. धरणगावात प्रवेश मार्गावरील आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी फाडल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या घटनेवरून धारणगावात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यात येत आहे. पाचोरा धरणगाव पारोळा या बंडखोरांच्या मतदारसंघात त्यांच्या सभा होणार आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने प्रवेश होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाल्याचे पहायला मिळाले.

हे देखील पाहा -

"शिव संवाद" यात्रा दौरा आज दुपारी १ वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेना कडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे बॅनर फाडल्याचा प्रकार पाहायला मिळाला.

जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आल्याची माहिती मिळतेय. द्वेष भावनेतून शिवसेना, युवासेनेचे स्वागत बॅनर फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT