Aditya Thackeray In Kokan  saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray In Kokan : तुमचं आमचं नव्हे हे गद्दार, गँगस्टर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टरांचे सरकार : आदित्य ठाकरे

Ganeshotsav 2023 : आदित्य ठाकरेंनी कोकण दौऱ्याची सुरुवात आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा गावातील निवासस्थापासून केली.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News : राज्यातील सरकार हे गद्दार, गँगस्टर, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर यांचे सरकार असल्याचा घणाघात आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज (गुरुवार) सिंधुदुर्गात दाखल झाले. त्यांच्यासमवेत खासदार विनायक राऊत (mp vinayak raut) आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) हे हाेते. (Maharashtra News)

ठाकरे हे विविध मान्यवरांच्या तसेच नागरिकांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेणार आहेत. ठाकरे यांच्या दाै-यामुळे सिंधुदुर्गातील खिळखिळ्या झालेल्या शिवसेनेला उभारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मी तर महाराष्ट्राच्या घरात चाललो आहे. दिल्ली आणि गुजरातच्या घरात चाललो नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला. आमचं महिला विधेयकला समर्थन आहे पण हे बिल म्हणजे निवडणुकी पुरता जुमला आहे असेही ठाकरेंनी नमूद केले.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत ठाकरे म्हणाले अद्याप या मंत्रिमंडळात असे काही मंत्री आहेत की महिलांना शिवीगाळ करतात. ते अजूनही मंत्रिमंडळात आहेत. एका आमदाराच्या मुलाने अपहरण केले ते सीसीटीव्हीत पण आले आहे पण कोणतीही कारवाई नाही,

ठाकरे पुढे बाेलताना म्हणाले एका गद्दार आमदाराने पोलीस स्टेशनला जाऊन गणपती मिरवणुकीत फायरींग केलं. त्याचे बुलेट्स मिळाले अद्याप त्याच्यावरही कारवाई नाही. याच महाराष्ट्रात वारकरी समुदायावर हल्ला होतो. बारसू तील महिलांवर हल्ला होतो हे असं घटनाबाह्य सरकार किती दिवस चालू शकत असा प्रश्न आहे. मुंबईत झालेल्या मतिमंद मुलीवरील अत्याचार प्रकरणावरच्या तपासाबाबत देखील ठाकरेंनी खंत व्यक्त केली.

आमदार अपात्रता या विधानसभा अध्यक्षांच्या मुद्यावर बोलताना विधानसभा अध्यक्षांनी वेळीच याचा निर्णय घ्यायला हवा हाेता. देशात लोकशाही राहिली आहे की नाही की हुकूमशाही चालली आहे असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातले हे सरकार गद्दार आणि गँगस्टरचं आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टरच हे सरकार आहे असेही ठाकरेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT