महाराष्ट्र

Dasara Melava: आयुक्तांनी लक्षात ठेवावं, एका महिन्यात आमचं सरकार येणार; आदित्य ठाकरेंचा कंत्राटावरून सरकारवर हल्लाबोल

Aditya Thackeray : शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा भाषण केलं. या भाषणातून त्यांनी सरकारवर तोफ डागली.

Bharat Jadhav

एका महिन्यात आमंच सरकार येणार, यामुळे आयुक्तांनी लक्षात ठेवावं आत राहायचं की बाहेर जायचं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी कंत्राटावरून शिंदे सरकारलाच चांगलेच घेरलं. पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात बोलतांना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकार सडकून टीका केली. आपल्या पहिल्या भाषणातच आदित्य ठाकरे यांनी आचारसंहिता आणि आदानी यांना देण्यात येणार कंत्राटावरून शिंदे सरकारवर तोफ डागली.गेल्या १४ वर्षात आपण पहिल्यांदा दसरा मेळाव्यात बोलत असल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीची आचारसंहिता आणि कंत्राटावरून हल्लाबोल केला.

परिवर्तन घडवण्याची वेळ आलीय

आजचा दिवस हे वर्ष २०२४ महत्त्वाचं आहे. माझ्यावर आजोबा,पणजोबांचा आशीर्वाद आहे. त्यांनी सांगितलं की, आदित्य हा क्षण खूप महत्त्वाचं आहे. हे साल खूप महत्त्वाचं आहे.येणारी लढाई खूप महत्त्वाची आणि खूप मोठी असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ज्या मतदारसंघात परिवर्तन घडावयचे आहे तो क्षण आलाय. ते साल आले आहे. दोन वर्षापासून राज्यातील निवडणूक कधी लागतील यांची प्रतिक्षा आपण पाहतो होतो,तो क्षण आलाय.

आचारसंहितेवरून सरकारवर टीका

आमदार असतांना किंवा सरकार मध्ये असतांना निवडणुकीला सामोरे जातांना काही निर्णय घेतले जातात.आता हे सरकार शेवटच्या क्षणी हजारो शासन निर्णय, जीआर काढत आहेत.अनेक महामंडळ काढू लागलेत. त्याचे निर्णय घेतले जात आहेत. परंतु जोपर्यंत अदानी ग्रुपचे सर्व कामे निघत नाहीत. जोपर्यंत अदानी ग्रुपचे जीआर निघत नाहीत, तोपर्यंत राज्यात आचारसंहिता लागू होणार नाही, असं एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

कंत्राटावरून आयुक्तांना इशारा आणि सरकारवर टीका

ही लढाई माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी महत्तवाची आहे. ही लढाई कोणत्या पदासाठी नाही,कोणत्या गोष्टीसाठी नाहीये. पण ही लढाई जी महाराष्ट्राची लूट चालू आहे. केंद्राकडून सुरतेच्या लुटीचा बदला घेतला जात आहे.ही लूट थांबवण्यासाठी ही लढाई लढायची आहे.ही लूट आणि भ्रष्टाचार तसेच मुंबई विकण्याचा जो डाव टाकला जात आहे. हे सर्व रोखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. हे तुमच्या हातात आहे, ही मुंबई अदानीच्या घशात घालायची आहे का नाही?

स्वत: साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके

या दोन वर्षात दोन गोष्टी झाल्या आहेत. एक म्हणजे महाराष्ट्राची लूट आणि दुसरं म्हणजे मुंबई असो किंवा राज्यातील इतर प्रकल्पांची कंत्राट हे त्यांच्या आवडत्या मित्रांना दिले जात आहेत.त्यांच्या घशात हे कंत्राट घालण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. स्वत: साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके देण्याचं काम हे सरकार करत आहे. हे रोखायचे असेल तर या निवडणुकीत एकजूट दाखवावी लागेल आणि सांगावं लागेल हा महाराष्ट्र कधी झुकणार नाही, कधी विकला जाणार नाही. राज्यात भ्रष्टाचार बोकाळलाय. आधी भाजपवाले भ्रष्टाचाराच्या एक-एक शब्दाचे अर्थ सांगायचे. परंतु आता शिंदे सरकारने मोठा भ्रष्टाचार केलाय.

अनेका खात्यात भ्रष्टाचार शिंदे सरकारने केलाय.मुंबईचा विचार केला तरी मागील वर्षात रस्त्यांचे दोन मोठे घोटाळे झालेत. १५ जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन मी घोटाळा उघड केला होता.त्यावेळी मीच पंतप्रधान मोदींना सांगितलं होतं यात तुमचं नाव खराब होत आहे.तुमची बदनामी होणार आहे, काही भ्रष्टाचारी तुमच्या हातातून काही चुकीचे काम करून घेत आहेत.ज्या कामांचे भूमिपूजन केले जात आहेत, ती कामे कधीच सुरू होणार नाहीत.

मुंबईतील रस्त्यांचा सहा हजार कोटी रुपयांचा मी उघड केला.त्यानंतर एक हजार कोटी रुपये मुंबईकरांचे वाचलेत. परंतु अजूनही पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा आपल्या डोळ्यासमोर होत आहे. गेल्या दोन वर्षात एकही रस्ता झाला नाहीये.हे खोके सरकार प्रत्येक दिवशी लूट करत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.आजही सहा हजार कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा केलाय.

आताच्या आयुक्तांना इशारा देत आदित्य ठाकरे म्हणाले, नव्या कंत्राटावर जर सही केली तर याद राखा, एक रुपया तरी त्या कंत्राटदाराला दिला.किंवा एक रुपयाही या खोके सरकारला दिला तर याद राखा एका महिन्यात आमचं सरकार येत आहे. आल्यानंतर तुम्ही विचार करा आत राहायचं की बाहेर जायचंय. प्रत्येक गोष्टीत यांनी घोटाळा केलाय. आनंदाचा शिधा असो किंवा शाळेचा गणवेश असेल,एकाही विद्यार्थ्याला गणवेश मिळाले नाही. परकीय गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली शिंदे सरकारने डावोसला जाणून ४० ते ४५ कोटी रुपये उडवल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT