Priya Berde On Gautami Patil  Saam TV
महाराष्ट्र

Priya Berde on Gautami Patil : प्रिया बेर्डे यांची गौतमी पाटीलवर सडकून टीका; म्हणाल्या, जोपर्यंत चवीने बघणारे..,

Gautami Patil News : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी गौतमीवर सडकून टीका केली आहे.

Satish Daud

Priya Berde On Gautami Patil : महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या शैलीवरून वादंग सुरू आहे. दररोज कुणी ना कुणी गौतमी पाटीलच्या नाचण्याकडे बोट दाखवत आहे. त्यावर आक्षेप घेत आहे. काल परवाच प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमी पाटीलला चांगलचं सुनावलं होतं. आज ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी गौतमीवर सडकून टीका केली आहे.

प्रिया बेर्डे यांची गौतमी पाटीलवर सडकून टीका

"तिचे कार्यक्रम बघणारे लोक या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, जोपर्यंत बघणारे थांबणार नाहीत, तोपर्यंत हे असंच चालू राहील, अशी टीका प्रिया बेर्डे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर केली. त्याचबरोबर आम्ही याविरोधात आवाज उठवू, लोकांना ट्रोलिंग करू द्या, आम्ही बोलायचं थांबवणार नाही, असा इरादाही अभिनेत्या प्रिया बेर्डे यांनी बोलून दाखवला.

रघुवीर खेडकर यांची गौतमी पाटीलवर टीका

"बऱ्याच गावातील लोक 100 कलावंत असणाऱ्या तमाशाला दोन लाख रुपये देण्यासाठी खुटतात. अक्षरक्षः हात जोडतात. गौतमी पाटीलला पाच लाख रुपये देतात. कलेची गौतमी पाटील करु नका. लोककला लोककलाच राहिली पाहिजे. मुले कोणत्या वळणाला चालली आहेत. आई वडिलांचे लक्ष कुठे आहे?", असा सवाल रघुवीर खेडकर यांनी उपस्थित केला होता.

"काय चाललंय हे? तमाशाला आजपर्यंत नावं ठेवली जात होती. तमाशामधल्या कुठल्या मुलीने असे हातवारे केले होते? गौतमी पाटीलने केलेले हातवारे पाहण्यासाठी तुम्ही मारामाऱ्या करता. महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे? याकडे पालकांनी, राजकारण्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होईल," असा घणाघातही रघुवीर खेडकर यांनी केला.

इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटीलवर टीका

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रसिध्द किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सुद्धा गौतमी पाटीलवर टीका केली होती. "आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही," असं इंदुरीकर महाराजांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; इंजिनियरिंग केल्यानंतर क्रॅक केली UPSC; अनुपमा अंजली यांचा प्रेरणादायी प्रवास

Tuesday Horoscope : प्रेमाला नवे पंख फुटतील, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचं स्वप्न पूर्ण होणार

Nishikant Dubey : मराठी भाषिकांना आपटून आपटून मारणार? भाजप खासदाराची धमकी, VIDEO

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट? राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध भूमिका, VIDEO

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT