Akola News: अकोल्यात मोठी दुर्घटना, वादळामुळे जुने झाड कोसळले; 40 ते 50 जण दबल्याची भीती

अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असताना टिनशेडवर एक जुने झाड कोसळलं आहे.
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

Akola News: विदर्भातील अकोला जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असताना टिनशेडवर एक जुने झाड कोसळलं आहे. यामध्ये 40 ते 50 जण टिनशेडखाली दबले गेले असल्याची माहिती आहे. यापैकी काहींचा दुर्देवी मृत्यू देखील झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून बचावकार्यास सुरूवात केली आहे. (Latest Marathi News)

अकोल्यात खळबळजनक घटना घडली आहे .अकोल्या शहरातील पारस येथील बाबुजी महाराज मंदिराच्या आवारात एक जुने झाड कोसळल्याचा घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत चाळीस ते पन्नास जण अडकल्यची माहिती समोर आली आहे. या झाडाखाली दबलेल्या २० जणांना आतापर्यंत बाहेर काढले आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Akola News
Deepali Sayed News: पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचा आरोपावर दीपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

नेमकं काय घडलं ?

अकोला जिल्ह्यात सर्वत्र गारपिटीसह पाऊस झाला होता. रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. याचदरम्यान, बाळापूर तालुक्यातील पारस येथे मंदिरातील टिनशेडवर लिंबाचे मोठे झाड वादळामुळे पडल्याने ४० ते ५० भाविक अडकून पडले. त्यातील काही जखमी भाविकांना बाहेर काढण्यात यश मिळाले.

रात्री उशिरापर्यंत मदत कार्य सुरू आहे. या झाडाखाली दबलेल्या २० जणांना आतापर्यंत बाहेर काढले आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Akola News
Pimpri-Chinchwad Cime News: सोशल मीडियावर PM नरेंद्र मोदी-अमित शहा यांची बदनामी; पिंपरी चिंचवडमधील तरुणाला अटक

अकोला शहरात दोन दिवसांपूर्वी दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे आणि घराचे नुकसान झाले होते. मात्र, रात्री ८ वाजताच्या सुमारास ढग दाटून आले आणि पाहतापाहता दमदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. शहरातील अनेक सखल भागात अवघ्या अर्धातासात पाणी साचले. काही ठिकाणी रस्त्यावर डबकी साचल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com