Actor Makarand Anaspure Saam Tv
महाराष्ट्र

Actor Makarand Anaspure : 'गावकी आणि भावकी...; मराठा-ओबीसी आरक्षणावर मकरंद अनासपुरेंचे मोठं भाष्य

Actor Makarand Anaspure On Maratha - OBC Reservation : प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षण वादावर भाष्य करत समाजात एकजुटीचं आवाहन केलं आहे. “गावकी आणि भावकी एकत्र होती तसेच पुढेही राहूया” असे म्हणत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली.

Alisha Khedekar

  • मकरंद अनासपुरेंनी आरक्षण वादावर समाज एकजुटीचं आवाहन केलं

  • “गावकी-भाऊकी टिकली पाहिजे” असा संदेश त्यांनी दिला

  • नाम फाउंडेशनमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम सुरू आहेत

  • अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने पुढे यावं अशी विनंती

प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे नेहमी त्यांच्या अभिनयासाठी चर्चेत असतात. ते त्यांच्या विनोदीशैलीने चाहत्यांना खळखळून हसवतात. मराठी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे अनासपुरे दिलासखुलासपणे समाजिक विषयांवरही आवर्जुन भाष्य करत असतात. आता राज्यात सुरु असलेल्या मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरील वादावरही अनासपुरेंनी भाष्य केलंय. 'गावात गावकी आणि भावकी एकत्र होती. यापुढेही एकत्र राहू, असे म्हणत मकरंद अनासपुरे यांनी आरक्षणावरून सुरु झालेल्या वादावर भावना व्यक्त केल्या आहेत.

माध्यमांनी घेतलेल्या मुलाखतीत अभिनेते मकरंद अनासपुरे मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर म्हणाले, "समाज तुटू नये, समाज तुटला तर अराजक निर्माण होते. आपण भावंडांसारखे आणि एक समाज म्हणून राहतो. जेव्हा आपल्यावर संकट येते तेव्हा एकत्रितपणे आपण धावून जातो. त्यामुळे आपण एकजुटीने राहूया. एका मुळीची आणि एका लाकडाची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. मुळीच्या अवस्थेत आहोत तोपर्यंत तोडणे शक्य नाही आणि लाकूड होत गेलो तर तोडणं सोप होईल. शेवटी गावकी आणि भाऊकी एकत्र होती तसेच एकत्र राहू" अशी इच्छा मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अनासपुरे सामाजिक कार्यातही नेहमी सक्रिय असतात. नाम फाउंडेशनद्वारे सुरवातीला त्यांनी वैयक्तिक पातळीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले त्यांना आर्थिक मदत केली. त्यानंतर नाम फाउंडेशन या संस्थेला त्यांनी सामाजिक स्वरूप दिले. या संस्थेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबरोबरच झाडे लावणे, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, कृषी केंद्रे, रोजगार केंद्रे असे विविध उपक्रम राबवण्यात येतात.

राज्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानावर मकरंद अनासपुरे म्हणाले, "पाण्याची चळवळ आम्ही चालवली नाही तर त्याचा दशकस्फूर्ती सोहळा साजरा केला. यंदा पाऊस जास्त झाला, निसर्गाचा अंदाज कोणालाही देता येत नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळते. त्यामुळे अतिवृष्टी जास्त झाली आहे, राज्य सरकारला कळकळीची विनंती जास्तीत जास्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी दशकापासून आम्ही भूमिका मांडत आहोत. खरिपाच्या हंगामातील तोंडाशी आलेला घास जाण्याची भीती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भरी मदत शेतकऱ्यांना केली पाहिजेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जिल्‍हा परिषद, पंचायत समिती सदस्‍यपदासाठी आज आरक्षण सोडत

Local Body Election : निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही, अजित पवारांच्या आमदाराच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ

Budh Gochar 2025: दिवाळीनंतर बुध ग्रहाचं होणार गोचर; 'या' ३ राशींच्या व्यक्ती होणार मालामाल

Marathi vs Hindi clash : आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकला, कल्याणमध्ये अमराठी महिलेची मुजोरी, हिंदीतूनच बोलण्यासाठी दमदाटी

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

SCROLL FOR NEXT