buldhana, hsc, teachers
buldhana, hsc, teachers saam tv
महाराष्ट्र

HSC Exam 2023 : बारावी गणित पेपरफूटी प्रकरणात माेठी अपडेट; चार शिक्षकांबाबत घेतला गेला 'हा' निर्णय

संजय जाधव

Buldhana : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात बारावी गणित पेपर फुटीच्या (HSC Exam Maths Subject Paper Leaked) प्रकरणात अटक (arrest) केलेल्या सात जणांपैकी चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. (Maharashtra News)

निलंबनाची कारवाई केलेले सर्व शिक्षक स्वयंअर्थसाह्यीत शाळांमध्ये कार्यरत होते. कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल करून या मास्तरांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली.

बारावी गणिताचा पेपर व्हायरल करणाऱ्यांमध्ये गजानन आडे आणि गोपाल शिंगणे हे दोघे स्वतःच्याच शिक्षण संस्थांचे संचालक आहेत. तेथेच शिक्षक म्हणून कार्य करत होते. त्याचप्रमाणे अ. अकील अ. मुनाफ हा जाकीर हुसेन उर्दू स्कूल, लोणार येथे प्राचार्य म्हणून कार्यरत हाेते. तसेच अंकुश चव्हाण हा सेंट्रल पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे कार्यरत होता.

विधानसभेपर्यंत पाेहचलं प्रकरण

कॉपी प्रकरणात विशेष लक्ष घालणाऱ्या या चारही शिक्षकांना आता चांगलेच महागात पडले आहे. राज्यभर हे प्रकरण गाजले. विधानसभेतही विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पेपर फुटीचे प्रकरण रेटून धरले.

साखरखेर्डा पाेलिसांची कारवाई

शासनाने तातडीने सुत्रे हलवली. प्रशासनाकडून प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्यांची शोधमोहिम सुरू केली. दरम्यान, या प्रकरणात चार शिक्षक आणि कॉपी पुरवण्यासाठी प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या बाहेरच्या तीन जणांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली. आता या प्रकरणाचा सखोल तपास विशेष पथकाकडून करण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्त्वाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळणार?

LSG sv RR : राजस्थानसमोर लखनौचं १९७ धावांचं लक्ष्य ; के.एल. राहुल, दीपक हुडाची कडवी टक्कर

SCROLL FOR NEXT