lohagad fort, youth, viral video, video viral, lonavala, khandala saam tv
महाराष्ट्र

Lohagad Fort News: काळजी मिटली... आता विकेंडचा प्लॅन जरुर करा; जाणून घ्या पाेलिसांच्या सूचना

Rules for Weekend Trekking Plans: याबाबतच्या सुचना ग्रामपंचायत कार्ला यांना देखील देण्यात आल्या आहेत.

दिलीप कांबळे

Lohagad Fort Viral Video: लोहगड किल्ल्यावर पर्यटक‍ांची हाेणारी गर्दी लक्षात घेता पाेलिसांनी त्यावर नियंत्रण ठेवण्यासोबत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कार्ला ते लोहगड पाहणी केली. त्यावर अँक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे अशी माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली. (Maharashtra News)

रविवारी लोहगड किल्ल्यावर पर्यटक‍ांची माेठी गर्दी (Heavy Rush Of Visitors On Lohagad Fort) झाली. त्यासोबतच भाजे लेणी व धबधबा, मळवली रेल्वे स्थानक, कार्ला फाटा, कार्ला लेणी परिसरात देखील पर्यटकांची माेठी गर्दी हाेती. यामुळे वाहतूक कोंडी झाली. याची दखल पोलीस प्रशासनाने गंभीररित्या घेतली आहे. यावेळी वाहतूक व्यवस्थापन पाहणीमध्ये सत्यसाई कार्तिक यांच्यासह लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

असे ठरले नियाेजन

शनिवार व रविवारची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कार्ला फाटा येथे नो पार्किंग व डायव्हर्षन बोर्ड लावणे.

वाहन चालकांना सुचना देण्याकरिता पी.ए. सिस्टिम लावणे.

रोडच्या दोन्ही बाजूने वाहन पार्कींग होणार नाही याकरीता पांढरे पट्टे मारणे.

कार्ला फाटा येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे.

शनिवार व रविवार या गर्दीचे दिवशी पाच स्वयंसेवक वाहतुक व्यवस्थापनाकरीता देणे.

कार्ला फाटा येथे गर्दी होवू नये याकरीता मळवली बाजूकडून येणारी वाहने ही कार्ला गावातून मेन हायवे रोडला पाठविण्यात येणार आहेत. याबाबतच्या सुचना ग्रामपंचायत कार्ला यांना देखील देण्यात आल्या आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

SCROLL FOR NEXT