सैलानी बाबा दर्गा 
महाराष्ट्र

सैलानीबाबा दर्गा परिसरात होणार भूसंपादन

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा ः बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले सैलानी बाबा दर्ग्यावर लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांच्या सोयी-सुविधांसाठी सैलानी बाबा दर्गा परिसरातील जमीन संपादित केली जात आहे. या प्रक्रियेला भूसंपादन अधिकाऱ्यांनी ही मोहीम सुरू केली आहे.

या दर्ग्याभोवती 4 हेक्टर जमीन संपादित करून देण्यासंदर्भात सैलानी बाबा अस्थाई ट्रस्टचे अध्यक्ष अब्दूल समद यांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे मागणी केली होती. या पत्राच्या प्रती त्यांनी मुख्यमंत्री, अवकाफ मंत्री तथा महसूलमंत्री यांना ही पाठविल्या होत्या. त्यानुसार महसूलमंत्री यांच्याकडून भूसंपादन अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकाऱ्यांनी सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दूल समद यांना संपादित करीत असलेल्या जमिनीचा परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना 16 जुलै 2021 रोजी एका पत्राद्वारे दिल्या आहेत.

बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे हजरत हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांचा शेकडो वर्षे जुना प्रसिद्ध दर्गा आहे. दर्ग्याचा कारभार महाराष्ट्र वक्फ बोर्डच्यामार्फत नियुक्त केलेल्या अस्थाई ट्रस्टद्वारे चालतो. दरवर्षी होळीच्या सणावर बाबाच्या संदलला या ठिकाणी भारतभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. सैलानी या ठिकाणी बाबांच्या दर्ग्यासाठी असलेली एक गुंठा जागे व्यतिरिक्त दर्गा सभोवातील सर्व जागा मुजावरांची असल्याने भाविकांना सोयी-सुविधा मिळत नव्हत्या.

या ठिकाणी मुजावर यांनी आपली घरे व दुकाने बांधल्याने भाविकांना दर्शनासाठी अडचण निर्माण होत आहे, असा दाखला देत सैलानी बाबा अस्थाई ट्रस्टचे अध्यक्ष अब्दूल समद यांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी सैलानी बाबा दर्गा सभोवतीची 4 हेक्टर जमीन संपादित करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना एका पत्राद्वारे मागणी केली होती.

या पत्राची कॉपी त्यांनी मुख्यमंत्री, अवकाफ मंत्री तथा महसूलमंत्री यांना ही पाठविल्या होत्या. त्यानुसार महसूलमंत्री यांच्याकडून भूसंपादन अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांनी सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दूल समद यांना संपादित करीत असलेल्या जमिनीचा परिपूर्ण प्रस्ताव दाखल करण्याच्या सुचना 16 जुलै 2021 रोजी एका पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती भूसंपादन अधिकारी भूषण अहिरे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अजित पवार उद्या नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर

VIDEO : टिंगरेंनी शरद पवारांसह काँग्रेस, शिवसेनेला कोर्टात ओढलं

Sangli Politics: सांगलीत मोठी राजकीय घडामोड, ठाकरेंच्या युवासेनेचा भाजपला पाठिंबा

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची अलोट गर्दी; २४ तास घेता येणार दर्शन

Surya Gochar 2024: सूर्याचं नक्षत्र गोचर 'या' राशींच्या जीवनात आणणार वादळ; आर्थिक अपयशही येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT