विधानसभा निवडणुकीदरम्यान, सांगलीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सांगलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेने भाजपला पाठिंबा दिला आहे. जतमध्ये युवासेनेने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गटाला धक्का बसला आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांना जत युवासेनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
सांगलीच्या जतमधील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन जत मतदारसंघात पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. जतच्या युवा सेनेला विधानसभा निवडणूकीत काँग्रेसकडून विश्वासात घेण्यात येत नसल्याने आणि डावलल्याने गोपीचंद पडळकरांना पाठिंबा देण्यात येत असल्याचे जत ठाकरे गट युवा सेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
तर पदावर नसताना ज्ञानेश्वर धुमाळ यांने जुने लेटरहेड वापरून पत्र दिल्याचा शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी स्पष्टीकरण दिले. लेटरहेड वापरून बोगस पाठिंबा दिल्याप्रकरणी ज्ञानेश्वर धुमाळ आणि इतरांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात येणार असल्याचे संजय विभूतेंनी स्पष्ट केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.