कर्जत पवारांमुळे अॉक्सीजनबाबत झाले स्वयंपूर्ण

रोहित पवार
रोहित पवार
Published On

अहमदनगर: जिल्ह्यातच ऑक्सिजनची निर्मिती करून त्या बाबत स्वावलंबी व्हायचे हे धोरण कर्जत येथून सुरू होत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. मात्र, नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आमदार रोहित पवार यांची कार्यपद्धती उत्कृष्ट आहे. घाबरू नका मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून येथील उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज ऑपरेशन थेटर आणि ऑक्सिजननिर्मिती प्लॅन्टचा प्रारंभ मंत्री मुश्रीफ यांचे हस्ते व आमदार रोहित पवार यांचे उपस्थितीत झाला. या वेळी पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते.

रोहित पवार
सात-बारातील हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा बदल माहितीय?

या वेळी आमदार रोहित पवार,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे,जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. संदीप सांगळे, गट विकास अधिकारी अमोल जाधव, सभापती मनीषा जाधव, उपसभापती राजेंद्र गुंड, समाज कल्याण समिती सभापती उमेश परहर यांच्यासह राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ते म्हणाले, कर्जत अविकसित तालुका आहे. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू होत आहे. कोरोन च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत येथील आरोग्य विभाग व प्रशासनाने चांगले काम केले आहे. स्वातंत्र्य दिनापासून अपवाद वगळता निर्देशित केलेल्या आस्थापना सुरू होत आहेत. मात्र, ज्या दिवशी सात हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजन लागेल, त्या क्षणापासून ऑटो कर्फ्यू सुरू होईल. पावसाने ओढ दिल्याने झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेत पुढील उपाययोजना केली जाईल

नैसर्गिकरित्या ऑक्सिजननिर्मिती करणारा कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील हा जिल्ह्यात सर्व प्रथम प्रकल्प आहे. या मुळे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जततालुका सर्वप्रथम प्राणवायू स्वावलंबी झाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटेत सर्वांनी प्रशासन व राजकीय पदाधिकारी-नागरिक यांनी एकत्रितपणे चांगले काम केले. बारा हजार रुग्णांना कोरोनामुक्त केले. याचा अभिमान आहे. अत्याधिक आरोग्य सुविधा देण्याबरोबर लसीकरण वाढविण्यात येईल. या पुढेही अशीच कार्यपद्धती राहील.

-रोहित पवार,आमदार.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com