Walmik Karad News SaamTv
महाराष्ट्र

Beed News: वाल्मीक कराडच्या कोठडीतील CCTV कॅमेरे बंद का? देशमुख कुटुंबाचा सवाल, जेलमध्ये नक्की काय घडतंय?

Walmik Karad Gets VIP treatment in Beed Jail Sparking Controversy: वाल्मिक कराड बीड कारागृहात आहे. मात्र, वाल्मिक कराड ज्या ठिकाणी कैदेत आहे. त्या ठिकाणचे कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

खंडणी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड बीड कारागृहात अटकेत आहे. मात्र, वाल्मिक कराड ज्या ठिकाणी कैदेत आहे. त्या ठिकाणचे कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे.

देशमुख कुटुंबियांनी कारागृहातील सीसीटीव्हींच्या फुटेजची माहितीच्या अधिकारात मागणी केली होती. मात्र, अधिक्षकांच्या एका पत्रात कॅमेरे बंद असल्याचं समोर आलं. यावर देशमुख कुटुंबाच्या निकटवर्तीयांनी सवाल उपस्थित केला आहे.

१४ जानेवारीला वाल्मीक कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. मात्र, तेथील आधीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलेले आहेत. वाल्मीक कराड हे नऊ नंबरच्या बऱ्याकमध्ये आहेत. त्याच ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद का? असा सवाल देशमुख कुटुंबाचे प्रतिनिधी दादासाहेब खिंडकर यांनी उपस्थित केला आहे.

'जेल प्रशासनाच्या पत्रामध्ये ९ नंबर बरेकचे सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याचं दाखवण्यात आलंय. ज्या कर्मचाऱ्यानं कायदा मोडला आहे, त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे. आरोपीला मदत करणारे तेथीलच काही कर्मचारी आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार आहोत', असं दादासाहेब खिंडकर यांनी सांगितलं.

वाल्मिक कराडच मुख्य सुत्रधार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड हा मुख्य सुत्रधार असल्याचं स्पष्ट झालंय. य प्रकरणात एसआयटी आणि सीआयडीच्या सखोल तपासानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आलं.

या आरोपपत्रात वाल्मिक कराड हा हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय. बीड कारागृहात तो खंडणी प्रकरणी अटकेत आहे. मात्र, अटकेत असूनही त्याला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याची माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

Maharashtra Live News Update: - पुण्यात भीषण अपघात! पौड रस्त्यावरील मेट्रो स्टेशनच्या पिलरला धडकली कार

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Horoscope 6 November: या राशींसाठी आजचा दिवस असेल खास, तुमची रास कोणती?

Suraj Chavan Wife : बिग बॉस किंग सूरज चव्हाणची बायको कोण? नावही आहे खास

SCROLL FOR NEXT