सोनपेठ तालुक्यातील बलात्कार प्रकरणी ‘त्या’ तिन्ही आरोपींना अटक! राजेश काटकर
महाराष्ट्र

सोनपेठ तालुक्यातील बलात्कार प्रकरणी ‘त्या’ तिन्ही आरोपींना अटक!

तिसरा आरोपी पोलिसाच्या तांब्यात

राजेश काटकर

परभणी : सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथील एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याने तिने विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Accused arrested in rape case in Sonpeth taluka)

हे देखील पहा -

डिघोळा तांडा (Dighola Tanda) येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीस येथील तिघांनी दिनांक १२ रोजी दुपारी एक ते पाच वाजेच्या सुमारास फोन करून पडक्या शाळेत बोलावून घेऊन बलात्कार (Rape) केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवाय या अत्याचारामुळेच पीडित मुलीने दि. १४ रोजी दुपारच्या सुमारास विषारी औषध पिले होते त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी अंबाजोगाई (Ambajogai) येथे दाखल केले, असता तिची प्रकृती गंभीर झाली त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले होते. परंतू तिच्यावर उपचार सूरू असताना तिचे सोमवारी रात्री निधन झाले.

दरम्यान या प्रकरणात दि. २० रोजी पीडितेच्या नातेवाईकांनी सोनपेठ पोलिसात तक्रार दाखल केली त्यावरून सोनपेठ पोलिसांनी तीन आरोपी विरुद्ध 376 ड 354 ड तसेच बालकाचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (Sexual Harassment Act) कायदा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक लोढा, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने हे करत आहेत. या प्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींसह तिसऱ्या आरोपीला देखील ताब्यात घेतले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT