लातूर : नुकतेच भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीमधील (MVA Goverment) अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. अशातच आता आघाडीतील प्रमुखपदी असणाऱे खुद्द राज्याचे मुख्यमंत्रीच आपले पुढील टार्गेट असल्याचही सोमय्या यांनी सांगितलं आहे आणि यावरच शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सोमय्यांवरती जोरदार टीका केली आहे. किरीट सोमय्यांना भाजपाने सोडलय, सरकार चालवू द्यायचं नाही असा डाव त्यांचा आहे तसेच शक्ती कपूर (Shakti Kapoor) जसं भो-भो करतो तसं काहीही सोमय्या बोलतात असं खैरे म्हणाले आहेत. (Criticism of Chandrakant Khaire on Kirit Somaiya)
हे देखील पहा -
किरीट सोमय्याकडे पुरावे नाहीत त्याला भाजपाने सोडलं आहे सरकार व्यवस्थित चालू द्यायचं नाही असा डाव आहे. किरीट सोमय्या यांच मी लोकसभेत शक्ती कपूर असं नाव ठेवलं होतं अशी माहिती खुद्द खैरे यांनी दिली.
तसेच उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे चिरंजीव आहेत हिंदुत्ववाद त्यांनी मोठा केलाय उध्दव ठाकरे अश्या धमक्यांना घाबरत नाहीत सोमय्याने आगाऊपणा केला तर भाजपची कुंडली काढावी लागेल असा इशाराच खैरेंनी भाजपला दिला शिवाय कोविड काळात पैसे गोळा केला आता जन आशीर्वाद यात्रेत प्रत्येक जिल्ह्याला साडेचार कोटी दिले याचा भ्रष्टाचार उघडावा लागेल या जन आशीर्वाद यात्रेत बॅनर होर्डिंग्ज लावले यासाठी पैसे वरून आले भ्रष्टाचार काढला पाहिजे असं वक्तव्य खैरे यांनी लातूर (Latur) इथं विश्रामगृहात केले आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.