Accused absconding from nagpur kamptee court saam tv
महाराष्ट्र

नागपूरमध्ये खळबळ! पोलिसांच्या हातावर तुरी देत न्यायालय परिसरातून आरोपीने ठोकली धूम

नागपूरमध्ये पोलीस प्रशासनात खळबळ उडवणारी घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : नागपूरमध्ये पोलीस प्रशासनात (Nagpur Police) खळबळ उडवणारी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी न्यायालयात पेशीसाठी आणलेला एक सराईत आरोपी पोलिसांच्या हातावर (Accused Absconding) तुरी देऊन फरार झाला आहे. शेख जाफर शेख मुझफर असं आरोपीचं नाव आहे. आरोपी शेख मुझफरने पळ काढल्याचे कळताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला होता. परंतु शेखला पकडण्यात पोलिसांना अपयश आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कामठी न्यायालयात (kamptee court) पेशीसाठी आणलेला एक सराईत आरोपी पळून गेला आहे. शेख जाफर शेख मुझफर या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली आहे. कामठी न्यायालयात आज तीन आरोपींची पेशी होती. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. मात्र, एका आरोपीनं संधी साधत इमारतीच्या मागील झुडपातून पळ काढला. पोलिसांनी त्या आरोपीचा पाठलाग केला पण तो पोलिसांच्या हाती लागला नाही.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT