Sindhudurg News Saam TV
महाराष्ट्र

Sindhudurg News : कामावरुन घरी जाणाऱ्या पाच महिलांना भरधाव डंपरची धडक, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, दोघींची प्रकृती चिंताजनक

पोलिसांनी डंपर चालक इकलास शेरखानला ताब्यात घेतलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : भरधाव डंपरने पाच महिलाना जोरदार धडक दिल्याची घटना मालवणमध्ये घडली आहे. काल संध्याकाळी काळसे हुबळीचा माळ येथे हा अपघात झाला. यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहे. दोन महिलांचा प्रकृती चिंताजनक असून सर्वांना रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दिवसभराचं काम उरकून महिला आपआपल्या घरी निघाल्या होत्या. मात्र कुडाळ- नेरुरपार येथून डंपर वेगाने येत होता. या डंपरने पाचही महिलांना जोरदार धडक दिली. यात एका वृद्ध महिलेचा जागाीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

काही वेळातच घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका दाखल झाली आणि जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी डंपर चालक इकलास शेरखानला ताब्यात घेतलं असून तो कोल्हापूरचा असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचा अधिक तपास मालवण पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

Virat Kohli : कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीनं विचित्र कारण सांगितलं, म्हणाला, जेव्हा ४ दिवसांत दाढी...

Maharashtra Live News Update : अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

Pune News : 'स्पा सेंटरमध्ये फक्त स्पा चालू ठेवा, अन्यथा...' पुणे पोलिसांचा मालकांना सज्जड दम

Vande Bharat : नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला; कुठे कुठे थांबणार? तिकिट किती? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT