Kasegaon-Sangli Car Accident | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Kasegaon-Sangli Car Accident : कराड तालुक्यातून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर कासेगावजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली : जिल्ह्यातील कासेगाव येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गवर कार व कंटनेरचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून सांगलीकडे (Sangli) निघालेल्या मार्गावर ही दुर्घटना घडली असून गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. कराड तालुक्यातून पुढे गेल्यानंतर काही अंतरावर कासेगावजवळ (Kasegaon) हा भीषण अपघात झाला आहे. अपघातातील मृत जयसिंगपूर येथील आहेत. अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे, सुनेशा अभिनंदन शिरोटे, विरु अभिनंदन शिरोटे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. (Accident on Pune-Bangalore National Highway in Sangli; 5 members of the same family die)

हे देखील पाहा -

हे कुटुंब कारमधून पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरकडे निघाले होते. यावेळी कासेगावजवळील येवलेवाडी फाटा येथे कार रस्त्याकडेला थांबलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील ५ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २ जण जागीच ठार झाले, तर ३ जण उपचारासाठी दवाखान्यात दाखल करताना मृत्यू पावले. कासेगावजवळ झालेल्या या अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. गाडीचा वरील टप आणि दरवाजे पूर्णपणे तुटलेले होते. वरचा भाग पूर्णपणे उडाला होता. तर आतील सीटचा भागही तुटलेला होता. रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणतीही ऑफर नाही; पहिल्या दिवसापासून ठाकरेंसोबतच! शिवसेनेच्या निष्ठावंत खासदाराची ठाम भूमिका|VIDEO

Maharashtra News Live Update: श्रीकांत शिंदे नेस्को सेंटरमध्य दाखल

Meloni Vs Trump : मेलोनी डोनाल्ड ट्रम्पवर संतापल्या; म्हणाल्या, मी कधीच कुणाकडे भीक मागत नाही!

Father’s Day Gift Ideas: फादर्स डे ला वडिलांच्या चेहऱ्यावर आणा हसू; हे ७ गिफ्ट आयडिया ठरतील बेस्ट

भीषण अपघात! 200 मीटर खोल दरीत वाहन कोसळून आग लागली; 5 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT