Nagpur Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Accident News: चालकाला डुलकी लागली अन् अनर्थ घडला, नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर यात्रेकरूंच्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

Nagpur News: अपघात झाला त्यावेळी या ट्रॅव्हल्समध्ये जवळपास 35 ते 40 यात्रेकरू होते.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur Accident News Today: नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गवर यात्रेकरू ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 प्रवास जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग मरारवाडी जवळ ट्रॅव्हल्स चालकाला अचानक डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

जबलपूर कडून नागपूरच्या दिशेने देव दर्शना घेऊन परत येत असताना या ट्रॅव्हल्स अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी या ट्रॅव्हल्समध्ये जवळपास 35 ते 40 यात्रेकरू होते. अपघातात जखमी झालेल्याप्रवाशांना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे दाखल करण्यात आले आहे. 5 जणांना नागपूरच्या मेडिकल येथे रेफर करण्यात आले आहे. तर इतर प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती आहे. (Accident News)

अपघात नेमका कसा झाला?

ट्रॅव्हल्स चालकाला पहाटे डुलकी आल्याने ही ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली उलटले. ही घटना आज गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात मात्र कुठलीही जीवित हानी झालेली नाही. जबलपूरकडून नागपूरकडे देवदर्शन घेऊन परत येत असलेल्या ट्रॅव्हल्स चालकाला मरारवाडी परिसरात डुलकी आल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या ट्रॅव्हल्समध्ये जवळपास 35 ते 40 यात्रेकरू होते. या अपघातात 10 जण जखमी झाले असून यातील 5 जणांना नागपूर मेडिकल येथे रेफर करण्यात आले. 5 जणांवर मनसर येथे उपचार सुरू आहेत. बाकी यात्रेकरू यांना टोल प्लाझा खुमारी येथे ठेवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway : मुंबईत पावसाची जोरदार हजेरी! मध्य रेल्वे विस्कळीत; प्रवाशांची तारांबळ | VIDEO

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी यांचे ७ बेस्ट कॉमेडी चित्रपट एकदा नक्की बघा

जय महाराष्ट्र! टेस्लाचा पहिला मान मराठीला, BKC मधील शोरूमची पाटी मराठीत

Monsoon Red Alert : पुढील ४ तास धोक्याचे, पुणे-साताऱ्याला रेड अलर्ट, अतिजोरदार पाऊस कोसळणार!

SCROLL FOR NEXT