15 मिनिटे उशीर झाला अन् उमेदवारीची संधी हुकली, भाजपला मोठा फटका|VIDEO

Mandakini Khamkar AB Form But Nomination Rejected: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. वॉर्ड क्रमांक 212 मधील अधिकृत उमेदवार मंदाकिनी खामकर यांचा उमेदवारी अर्ज फक्त 15 मिनिटांच्या उशिरामुळे फेटाळण्यात आला.

गेलेली वेळ कधीच परत येत नाही असे सर्वचजण लहानपणापासून शिकत असता आणि याची प्रचिती कित्येकदा अनेकांनी अनुभवली आहे. मात्र आता वेळ न पाळल्याने एका उमेदवाराची महापलिका निवडणूक लढण्याची संधी गमावल्याचे पाहायला मिळत आहे. मंदाकिनी खामकर असे संधी हुकलेल्या महिला उमेदवाराचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांना भाजपने उमेदवारी देत एबी फॉर्मही दिला होता. मात्र उशीर झाल्याने त्यांची ही संधी हुकली आहे. यामुळे याचा पक्षाला बसला आहे. मुंबई महानगपलिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वार्ड क्रमांक 212 मध्ये मोठी घडामोड घडली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी खामकर यांच्या हातात पक्षाचा एबी फॉर्म होता. मात्र तो असूनही फक्त 15 मिनिटाच्या उशिराने त्यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com