ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घर स्वच्छ ठेवण्यासाठी झाडू आणि पोछा रोज केला पाहिजे. पण कधीतरी चुकीच्या पद्धतीने केल्यास स्वच्छतेऐवजी आरोग्य आणि घरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
सुक्या लादिवर घरात झाडू जोर-जोरात मारल्यास धूळ खाली न बसता हवेत उडते. त्यामुळे श्वासाचे त्रास, सर्दी, खोकला आणि अॅलर्जी होऊ शकते म्हणून आधी लादि पुसून घ्यावी.
लादि पुसताना रोज पाणी बदलून घ्यावे स्वच्छ पाणी वापरावे. अस्वच्छ पाणी वापरून पोछा केल्यास जंतू फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागी पसरतात.
जास्त साबण किंवा घाणेरडा पोछा वापरल्यास फरशी चिकट होते. त्यामुळे पायांना मळ लागतो आणि घसरून पडण्याची शक्यता असते.
चुकीच्या पोस्चरमध्ये झाडू आणि पोछा केल्यास पाठ, मान आणि हात दुखू शकतात. रोज असे केल्यास दीर्घकालीन वेदना होऊ शकतात.
खूप कडक झाडूने झाडू मारल्यास किंवा चुकीचे केमिकल वापरल्यास फरशीचा पॉलिश निघते, स्क्रॅचेस पडतात आणि चमक कमी होते.
झाडू आणि पोछा योग्य साधने वापरुन जसे की, स्वच्छ पाणी, योग्य क्लिनर आणि योग्य पोस्चर वापरून केल्यास घरही स्वच्छ राहते आणि आरोग्यही चांगले राहते.