ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सरबत सांडणे, तेल सांडणे, साखर पडणे तसेच साबणाचे तुकडे किंवा ओलसरपणामुळे फरशीवर चिकटपणा येतो आणि धूळ लवकर बसते.
एका भांड्यात गरम पाणी करुन घ्या. गरम पाण्यात मॉप भिजवून फरशी पुसा. फरशीवर पडलेले साधे चिकट डाग लगेच निघून जातात.
१ बादली गरम पाण्यात अर्धा कप व्हिनेगर टाका आणि मिक्स करुन घ्या. मॉपने पुसल्यास तेलकट आणि चिकट डाग सहज निघतात.
चिकट जागी थोडा बेकिंग सोडा शिंपडा. 5 ते 10 मिनिटांनी ओल्या कापडाने स्वच्छ घासा डाग साफ होतात.
गरम पाण्यात 2 ते 3 थेंब डिशवॉश लिक्विड टाका. फरशीवरील तेलकट चिकटपणा पूर्णपणे निघतो.
लिंबाचा रस आणि मीठ यांचे मिश्रण बनवून चिकट डागांवर टाका. हे नैसर्गिक मिश्रण असून फरशी स्वच्छ करण्यास मदत करते.
मार्बल फरशीसाठी व्हिनेगर वापरणे टाळा. तसेच लाकडी फरशीसाठी जास्त पाणी वापरू नका.
फरशी पुसल्यानंतर सुक्या कापडाने पुन्हा पुसा. यामुळे चिकटपणा पुन्हा येत नाही.
रोज फरशी पुसा फरशी पुसताना जास्त साबण वापरू नका. तसेच सांडलेले पदार्थ लगेच पुसा फरशी कायम चमकदार राहील.