ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरातील पडदे स्वच्छ असतील तर संपूर्ण घर फ्रेश दिसते. कमी वेळेत आणि कमी मेहनतीत पडदे स्वच्छ करण्याची ही सोपी ट्रिक एकदा वापरुन बघा.
पडदे धुण्यापूर्वी बाहेर नेऊन ते नीट झटकून घ्या. यामुळे पडद्यांवर साचलेली धूळ थोड्या प्रमाणात निघते आणि धुताना कमी मेहनत लागते.
बादलीत थोडे कोमट पाणी घ्या. कोमट पाण्यामुळे मळ व तेलकटपणा लवकर बाहेर निघतो.
पाण्यात 1 चमचा डिटर्जंट 1 चमचा बेकिंग सोडा आणि थोडेसे व्हिनेगर टाका. हे मिश्रण तयार करुन घ्या.
पडदे या पाण्यात 15 ते 20 मिनिटे भिजत ठेवा. जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही, पडदे पाण्यात टाकल्यावर मळ आपोआप निघण्यास सुरुवात होते.
पडदे जास्त चोळू नका. हलक्या हाताने दाबून-दाबून धुतल्यास कापड खराब होत नाही.
वॉशिंग मशीनमध्ये टाकताना जेंटल मोड वापरा.हेव्ही स्पीन टाळावे. यामुळे पडदे सुरक्षित राहतात.
पडदे सावलीत वाळत टाकावे. पडदे थेट उन्हात वाळत टाकू नका. उन्हात वाळवल्याने पडद्यांचा रंग फिका होत जातो.
पडदे थोडे ओले असतानाच रॉडवर लावा. स्वतःहून सुरकुत्या जातात आणि इस्त्रीची गरज पडत नाही.