Mumbai-Goa highway Accident  saam tv
महाराष्ट्र

दुर्दैवी! परीक्षेहून परतणाऱ्या ३ विद्यार्थीनींवर काळाचा घाला; मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचालकाचाही मृत्यू

मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai-Goa highway Accident : मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक कशेडी घाट रस्त्यावर चोळई गाव हद्दीत भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षा चालकासह तीन विद्यार्थीनींचा जागीच मृत्यू झाला आहे. या तिन्ही विद्यार्थीनी परीक्षा देऊन घरी परतत होत्या. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

रिक्षा चालक उमर बडुर, हलिमा पोतेरे (वय- 23 रा. नांदवी), असिया बडुर (20 रा. गोरेगाव), नाजनिन करबेलकर (वय 23 रा. टेमपाले ) अशी मृतांची नावे आहेत. माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थीनी रिक्षाने खेड येथे परीक्षेसाठी गेल्या होत्या.

परीक्षा (Exam) आटोपून परतत असताना हा अपघात (Accident) झाला. कशेडी घाट रस्त्यातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला. त्यात चिरडून चौघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असून चारही मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

SCROLL FOR NEXT