Amravati News: कुऱ्हा मार्गावर विचित्र अपघात, भरधाव ट्रक रिक्षा, दुचाकीला धडकला, १४ गंभीर, दोघांचा मृत्यू

तिवसा ते कुऱ्हा मार्गावर आज, सोमवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास वाठोडा गावानजीक भरधाव ट्रकने ऑटो रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली.
Amravati News
Amravati Newssaam tv
Published On

अमर घटारे

Amravati News update: जिल्ह्यातील तिवसा ते कुऱ्हा मार्गावर आज, सोमवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास वाठोडा गावानजीक भरधाव ट्रकने ऑटो रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. हा अपघात इतका विचित्र होता की यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. 14 जण गंभीर जखमी असून, त्यात लहान मुलांचा देखील समावेश आहे.

Amravati News
Latur : लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात दोघे जागीच ठार

प्राप्त माहितीनुसार, तिवस्यावरून कुऱ्हा मार्गे जाणाऱ्या भरधाव ट्रकने कुऱ्हावरून प्रवासी घेऊन येणाऱ्या रीक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा अमरावतीच्या (Amravati) जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये एकूण 14 जण जखमी असून 7 जण गंभीरित्या जखमी झाले आहेत.

अपघातातील (Accident) जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात, नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून जखमींमध्ये उमेश शिंदे (रा. मोझरी), शितल माटे (रा. जळका), रेखा वाघमारे, (शे. बाजार), सीमा तेलंग, रोनक विशाल तेलंग, हिंगणघाट, श्रीकृष्ण वाघमारे, शे. बाजार, आरोही तेलंग, श्वेता शेंद्रे, विराट शेंद्रे, दीप्ती शेंद्रे, प्रांजली हेमंत गोरखेडे, ऋतुश्री गौरखेडे, सानवी गौरखेडे (सर्व रा. तिवसा) अशी जखमींची नावे आहेत. तर सोमा तापा कोरटकर (वय 45, रा. घोटा) व कैलास वाघमारे (वय 50 रा.शे.बाजार) अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीसांनी घटनेच्या पंचनामा केला असून पुढील कारवाई तिवसा पोलीस निरीक्षक संतोष ताले व सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुपंत खंडारे हे करत आहेत. रुग्णालयात (Hospital) यावेळी तिवस्याचे नगराध्यक्ष योगेश वानखडे, तर घटनास्थळी प्रहारचे योगेश लोखंडे व उपस्थित नागरिकांनी मदतकार्य केले.

Amravati News
Parbhani Crime News: घटस्फोटाच्या सुनावणीला कोर्टात आलेल्या पत्नीसोबत घडलं भयंकर, रागाच्या भरात पतीनं....

तर तिवसाचे उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नायब तहसीलदार आशिष नागरे देखील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com