Mumbai-Goa Highway Accident  Saam TV
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Raigad Accident: आजीच्या उत्तरकार्याला जाताना भीषण अपघात; 10 जणांचा मृत्यू

Accident News: माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन कदम

Raigad Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. इको कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली आहे.

इको कार आणि ट्रक यांची समोरसमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकमधील टक्कर एवढी जोरदार होती की इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या विरूद्ध दिशेने येऊन इको कार वर धडकल्याने हा अपघात झाला.

सर्व जण गुहागर तालुक्यातील हेदवी येथे आजीच्या उत्तरकार्याला जात होते. सर्वांनी पहाटे मुंबईहून प्रवास सुरु केला, मात्र माणगाव तालुक्यातील रेपोली येथे ट्रकची समोरा समोर धडक झाली. मुंबईहून आजीच्या उत्तरकार्याला येणाऱ्या जाधव आणि सावंत कुटुंबावर अशा प्रकारे काळाने घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस तातडीने अपघातस्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांसह बचावकार्य सुरु केलं. इको कारचा समोरील भागाचा चक्काचूर झाल्याने बचावकार्यातही अडचण येत होती. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरूषांचा तसेच एका लहान मुलाचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT