Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: पुणे-नाशिक महामार्गावर वारकऱ्यांना ST ची धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Pune-Nashik Highway: देहु येथून पुणे-नाशिक महामार्गावरुन त्र्यंबकेश्वर येथे पिकअप जीपमधून 27 पुरुष-महिला वारकरी जात होते.

रोहिदास गाडगे

Pune News: देहुनगरीतला तुकाराम बीज सोहळा संपन्न करुन त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

देहु येथून पुणे-नाशिक महामार्गावरुन त्र्यंबकेश्वर येथे पिकअप जीपमधून 27 पुरुष-महिला वारकरी जात होते. दरम्यान मंचरजवळील एकलहरे येथे लघुशंकेसाठी खाली उतरले असताना मंचरवरुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसने वारकऱ्यांना उडवले. (Lateat Marathi News)

या धडकेत एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिलीप सुतार असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव असून एसटी बस चालकाला मंचर पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT