Raigad News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News : ताम्हिणी घाटात अपघाताचा थरार, भरधाव कार ५०० फूट खोल दरीत कोसळली; तिघांचा मृत्यू

Raigad Tamhini Ghat Accident News : रायगडच्या ताम्हिणी घाटात थरकाप उडवणारी दुर्घटना घडली आहे. थार जीप ५०० फूट दरीत कोसळून तीन तरुणांचा मृत्यू झाला असून पोलीस व बचाव पथकाकडून शोधकार्य सुरु आहे. अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

Alisha Khedekar

  • रायगडच्या ताम्हिणी घाटात थार ५०० फूट दरीत कोसळून तीन तरुणांचा मृत्यू झाला

  • ड्रोन शूटमध्ये मृतदेह व गाडी दिसल्याने बचावकार्याला वेग

  • चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज

  • पोलिसांकडून अपघाताचा सविस्तर तपास सुरु

रायगडमध्ये भीषण अपघात घडला आहे. पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात एक थार कोसळली आहे. ही गाडी ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अवघड वळणावर चालकाचा नियत्रंण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत असून बचाव पथकामार्फत बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या ताम्हिणी घाट वर्दळीचा रस्ता आहे. या घाटातून नेहमीच गाड्यांची ये जा सुरु असते. या घटातील तीव्र वळणं फार धोकादायक आहेत. या घाटात बरेच अपघात यापूर्वी झाले आहेत. अशातच पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात एक थार ५०० फूट दरीत कोसळली आहे. इतक्या खोलवर गाडी कोसळल्याने गाडीतील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृत झालेल्या तीन तरुणांपैकी आणखी काही जण या गाडीत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवघड वळणावर चालकाचा नियत्रंण सुटल्याने थार जीप ५०० फूट दरीत कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

शिवाय बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र हा अपघात केव्हा झाला ? या बद्दल नेमकी माहिती नाही मात्र ड्रोन शुटमध्ये दरीत थार जिप आणि मृतदेह आढल्याने बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून मृतदेह बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb Benefits: हिवाळ्यात रोज डाळिंब खाल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update:पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर

अंधेरी रेल्वे स्थानकावर वृद्ध व्यक्तीकडून मुलीचं धर्मांतर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? पोलिस म्हणाले...

8th Pay Commission: १ कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका; महागाई भत्ता, HRA आणि ट्रॅव्हल अलाउंस होणार बंद? नेमकं कारण काय?

Dharmendra Health Update: ८९ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? ८ दिवसांनी आली हेल्थ अपडेट

SCROLL FOR NEXT